मुलींना शाळा शिकण्यासाठी करावा लागणार असा पेहराव

मुला-मुलींना स्वतंत्र रांगेत बसवून त्यांच्या मध्ये एक मोठा पडदा लावला जाईल. तसेच, मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका ठेवण्यात याव्या आणि हे शक्य नसेल, तर एखाद्या वृद्ध पुरुष शिक्षकाची नियुक्ती करावी, असे तालिबानच्या आदेशात सांगण्यात आले आहे.

    काबूल: अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांचा खरा चेहरा (The real face of the Taliban) पुढे येत आहे. मुलींना शिक्षण   (Girls Education) घेण्यासाठी परवानगी देण्यात आली तेव्हा केव शरिया कायद्यानुसारच मुलींना शिक्षण घेता येईल असे म्हटले होते. त्यानंतर मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे वर्ग चालवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आणि आता तर कॉलेजमध्ये मुलींना शिक्षण घेण्यासाठी पूर्ण शरीर झाकण्यासाठी अबाया आणि नकाब घालावं लागणार अजब फतवा तालिबान्यांनी काढला आहे.

    त्यामुळे सत्तेत आल्यानंतर महिलांबाबतचा तालिबानचा क्रूर चेहरा हळूहळू लोकांच्या समोर येत आहे. मुला-मुलींना स्वतंत्र रांगेत बसवून त्यांच्या मध्ये एक मोठा पडदा लावला जाईल. तसेच, मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका ठेवण्यात याव्या आणि हे शक्य नसेल, तर एखाद्या वृद्ध पुरुष शिक्षकाची नियुक्ती करावी, असे तालिबानच्या आदेशात सांगण्यात आले आहे.

    दुसरीकडे अफगाणिस्तानातील तालिबानाविरोधी संघटना नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (एनआरएफ) ने तालिबानचा पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. पंजशीरमध्ये आमचे कमांडर अजूनही महत्त्वाच्या पदांवर तैनात असून, आमचे सैनिकही पंजशीर खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी तालिबानचा सर्व ताकतीने सामना करत आहेत, असे म्हटले आहे.