Taliban Laws

तालिबानी नियमांनुसार, महिलांचे व्हीडिओ बनविणे, फोटोग्राफी करणे तसेच त्यांचे छायाचित्र वृत्तपत्र किंवा घरात लावले जाऊ शकत नाही. याशिवाय पुरुष आपल्या फोनमध्येही पत्नीचे छायाचित्र ठेवू शकत नाही. असे करणे तालिबानी नियमांच्या विरोधात मानले जाते. नुकतेच सरकार पूर्णपणे पडल्यानंतर पूर्वी ज्या भागात तालिबानचा ताबा होता, तिथे नाही लोकांचे फोन यासाठी फोडण्यात आले, कारण त्यात महिलांची छायाचित्रे होती.

    काबुल :  20 वर्षांनंतर सत्ता मिळविणाऱ्या तालिबानने महिलांसाठी क्रूर आदेश लागू करणे सुरू केले आहे. तालिबानी नियमांमध्ये महिला हाय हिल्सदेखील घालू शकणार नाहीत. कारण हिल्स घालून महिला चालतात तेव्हा त्यांच्या पावलांचा आवाज येईल. त्यामुळे पुरुष उत्तेजित होऊ शकतात, यासाठी महिलांनी पायात काय घालायचे याचा निर्णयदेखील तालिबानच करणार आहे. याशिवाय नेलपेंटच्या रंगावरही तालिबानी नजर असणार आहे. भडक रंगाचे नेलपॉलिश अजिबात मान्य करण्यात येणार नाही.

    दुसऱ्यांना दाखवू नये चेहरा

    जर एखाद्या घराच्या तळमजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर महिला राहते, तर ती राहात असलेल्या घराच्या खिडकीवर रंग करण्यात येतो किंवा त्यावर अशी स्क्रीन लावण्यात येते की, आतील महिला कोणालाही कोणत्याही परिस्थितीत दिसू शकणार नाही. महिलांना वयाच्या आठ वर्षांनंतर शिक्षित होण्याची परवानगी नसते व तोपर्यंत त्यांना केवळ कुराणचाच अभ्यास करण्याची परवानगी असते.

    छायाचित्र लावू नये

    तालिबानी नियमांनुसार, महिलांचे व्हीडिओ बनविणे, फोटोग्राफी करणे तसेच त्यांचे छायाचित्र वृत्तपत्र किंवा घरात लावले जाऊ शकत नाही. याशिवाय पुरुष आपल्या फोनमध्येही पत्नीचे छायाचित्र ठेवू शकत नाही. असे करणे तालिबानी नियमांच्या विरोधात मानले जाते. नुकतेच सरकार पूर्णपणे पडल्यानंतर पूर्वी ज्या भागात तालिबानचा ताबा होता, तिथे नाही लोकांचे फोन यासाठी फोडण्यात आले, कारण त्यात महिलांची छायाचित्रे होती.

    महिला वृत्त निवेदकांवर बंदी

    अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने महिला वृत्त निवेदकांवर बंदी घातली आहे. सरकारी वृत्तवाहिनीच्या महिला वृत्त निवेदकांना तालिबानने नोकरीवरून हटविले आहे. आता तालिबानी अँकर टीव्हीवर बातम्या सांगतील. खदीजा अमीना नावाची महिला सरकारी वृत्त वाहिनीवर निवेदक होती, तिलादेखील पदावरून काढण्यात आले आहे.

    एक दिवसापूर्वीच तालिबानने सांगितले होते की, महिलांच्या हिताचे रक्षण होईल. परंतु आता फक्त शरीयत कायद्यांतर्गतच महिलांना काम करण्यास परवानगी असल्याचे तालिबान सांगत आहे. नोकरीवरून काढल्यानंतर अफगाण वृत्त निवेदक खदीजा अमीना यांनी सांगितले की, मी काय करू, पुढच्या पीढीकडे काहीच काम असणार नाही. 20 वर्षांत जे काही मिळविले, ते सर्व गमावले. तालिबानी तालिबानी आहेत, ते बदलले नाहीत.

    हजारा समाजाच्या मुलींशी जबरदस्तीने लग्न

    आता तालिबानचे राज्य पुन्हा एकदा अफगाणिस्तानात परतले आहे. यामुळे हजारा लोक भीतीच्या छायेत आहे. अनेक ठिकाणी तालिबान लढाकू त्यांच्या मुलींशी जबरदस्तीने लग्न करत असल्याचे अहवाल आले आहेत. मात्र, अद्याप याला दुजोरा देण्यात आला नाही. तर काही भागात खून झाल्याचेही वृत्त आहे. हजारा हा शिया मुस्लिमांचा एक समूह आहे. ज्यांना अनेक दशकांपासून छळले जात आहे. हे शिया मुस्लिम, अफगाण लोकसंख्येच्या सुमारे 10%, जगातील सर्वांत जास्त छळले गेलेले अल्पसंख्यांक आहेत. कट्टरपंथी सुन्नी त्यांना मुस्लिम मानत नाहीत.

    असे आहेत तालिबानी नियम

    1. हाय हिल्सवर बंदी
    2. भडक रंगाच्या नेलपॉलिशला परवानगी नाही
    3. पायात काय घालायचे? याचा निर्णय तालिबान घेणार
    4. महिलांचे छायाचित्र वृत्तपत्रात किंवा घरात लावण्यास मज्जाव
    5. कोणालाही चेहरा दाखवू नये
    6. फक्त कुराणचाच अभ्यास करावा
    7. शरीयत कायद्यांतर्गतच महिलांना काम करण्यास परवानगी