इंग्लंडचा कॅप्टन इओन मॉर्गन
इंग्लंडचा कॅप्टन इओन मॉर्गन

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England Vs South Africa) यांच्यात मंगळवारी केपटाऊनमध्ये झालेला तिसरा टी-20 (T20) सामना इंग्लंडने नऊ विकेट्सने एकतर्फी जिंकला. या विजयानंतर इंग्लंडची टीम वादात सापडली आहे. इंग्लंडचा कॅप्टन इओन मॉर्गनला (Eoin Morgan) ड्रेसिंग रुममधून ‘कोड वर्ड’मध्ये संदेश पाठवण्यात आले होते. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनने (Michael Vaughan) या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. ही कृती नियमांच्या विरुद्ध असल्याचं सांगत वॉनने इंग्लिश टीमला घरचा आहेर दिला आहे.

  • माजी कॅप्टनने इंग्लंड टीमवर दर्शविली नाराजी

केपटाऊन (Cape Town):  इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England Vs South Africa) यांच्यात मंगळवारी केपटाऊनमध्ये झालेला तिसरा टी-20 (T20) सामना इंग्लंडने नऊ विकेट्सने एकतर्फी जिंकला. या विजयानंतर इंग्लंडची टीम वादात सापडली आहे. इंग्लंडचा कॅप्टन इओन मॉर्गनला (Eoin Morgan) ड्रेसिंग रुममधून ‘कोड वर्ड’मध्ये संदेश पाठवण्यात आले होते. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनने (Michael Vaughan) या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. ही कृती नियमांच्या विरुद्ध असल्याचं सांगत वॉनने इंग्लिश टीमला घरचा आहेर दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगची १९ वी ओव्हर सुरु असताना हा सर्व प्रकार घडला. इंग्लंड टीमचे विश्लेषक नॅथन लेमन ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. त्यांनी मॉर्गनला एक कार्ड दाखवले. या कार्डवर 4E आणि 2 C असे लिहिले होते. अर्थात या सर्व प्रकाराचा टीमला विशेष मदत झाल्याचा दावा इंग्लंडचा विकेटकिपर जॉस बटलर (Jos Buttler) ने फेटाळला आहे. “मॉर्गन आणि नॅथन अनेक दिवसांपासून एकत्र रणणिती तयार करतात. याच रणणितीनुसार त्यांनी एक प्रयोग राबवला. मॉर्गन हा जगातील एक श्रेष्ठ कॅप्टन आहे.’’ असे बटलरने सांगितले.

मायकल वॉन नाराज
इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन मात्र या सर्व प्रकारावर नाराज झाला आहे. त्याने ट्विट करत त्याची नाराजी व्यक्त केली. त्यानंतर इंग्लंडमधील ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील कॉलममध्ये देखील त्यांने हा मुद्दा मांडला. “मी इंग्लंडचा कॅप्टन असतो तर हा प्रकार कधीही केला नसता. मला नवे प्रयोग आवडतात, मी त्याला नेहमी उत्तेजन देतो. मात्र, विश्लेषकाने मैदानात कॅप्टनला सल्ला द्यावा हे मला पटत नाही’’, असे वॉनने स्पष्ट केले.

ECB ने दिले स्पष्टीकरण
इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) ने या सर्व प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. कॅप्टन मॉर्गनला ड्रेसिंग रुममधून काही गोष्टींची माहिती देण्यात आली होते हे ECB ने मान्य केले आहे. त्याचबरोबर तो सल्ला स्विकारणे हे सर्वस्वी कॅप्टनवर अवलंबून असल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडसमोर 192 रन्सचे लक्ष्य दिलं होते. इंग्लंडने ते लक्ष्य फक्त एक विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह इंग्लंडने तीन टी-20 सामन्याची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली आहे.