कोरोना विषाणूपेक्षाही महाभयंकर ठरतोय सुपरबग, शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ; काय आहे सुपरबग?

दहा वर्षांपूर्वी याचा शोध लागला होता. मात्र हा सुपरबग नेमका कुठून आला हे अद्याप काही समजलेलं नसून ते एक रहस्य असल्याचं म्हटलं जात आहे. कासाडेवाल हे जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मॉलीक्युलर मायक्रोबायोलॉडी अँड इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. रिसर्च करणाऱ्या संशोधकांच्या टीममध्ये भारतातील काही शास्त्रज्ञांचा देखील समावेश आहे.

    जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. मात्र आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक खतरनाक सुपरबग (Superbug) सापडला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर शास्त्रज्ञांना एक महाभयंकर सुपरबग आढळून आला आहे. हा मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स ऑर्गेनिज्म आहे. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याच औषधांचा काहीच परिणाम होत नाही. शास्त्रज्ञ डॉ. अर्टुरो कासाडेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कँडिडा ऑरिस (Candida Auris) असं या सुपरबगचं नाव आहे.

    दहा वर्षांपूर्वी याचा शोध लागला होता. मात्र हा सुपरबग नेमका कुठून आला हे अद्याप काही समजलेलं नसून ते एक रहस्य असल्याचं म्हटलं जात आहे. कासाडेवाल हे जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मॉलीक्युलर मायक्रोबायोलॉडी अँड इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. रिसर्च करणाऱ्या संशोधकांच्या टीममध्ये भारतातील काही शास्त्रज्ञांचा देखील समावेश आहे.

    कँडिडा ऑरिसवर उपचार करणं कठीण आहे कारण त्यावर कोणत्याच औषधांचा परिणाम होत नाही. तसेच मानवाच्या शरीरात याचा प्रसार हा वेगाने होत असतो. दिल्ली युनिव्हर्सिटीतील मेडिकल मायकोलॉजिस्ट डॉ. अनुराधा चौधरी आणि त्यांच्या टीमने अंदमान बेटाजवळील बेटे आणि भारत-म्यानमार यांच्यादरम्यानच्या बेटावरील आठ वेगवेगळ्या ठिकाणावरील माती आणि पाण्याची तपासणी केली.

    एप्रिल २०१९ मध्ये CDC ने या मायक्रोबच्या हल्ल्याची एक लिस्ट तयार केली होती. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, इराण, इस्रायल, जपान, केनिया, कुवैत, मलेशिया, मेक्सिको, नीदरलँड्स, नॉर्वे, ओमान, पाकिस्तान, पनामा, रशिया, सौदी अरब, सिंगापूर, साऊथ अफ्रीका, साऊथ कोरिया, स्पेन स्विर्झलँड, तैवान, यूएई, युके, अमेरिका या देशांतील लोकांना याचा संसर्ग झाला होता. यावर लस तयार करून त्याचा उंदरावर प्रयोग करण्यात आला.