जगभरात भासणार टॉयलेट पेपरची कमतरता, हे आहे कारण…

सुजानो एस ए या ब्राझिलच्या कंपनीची जहाजंदेखील या वाहतूक कोंडीत अडकली आहेत. सुजानो एसए ही टॉयलेट पेपर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा जगभर वितरित होणारा माल हा अगोदर जलमार्गाने पोहोचवला जातो. मात्र ही जहाजंच अडकून पडल्यामुळं लवकरच जगभरात टॉयलेट पेपरचा तुटवडा भासायला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

    जगभरात लवकरच टॉयलेट पेपरचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचं कारण आहे इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात झालेलं अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम. आतापर्यंत कधीही झालं नव्हतं, असं विचित्र ट्रॅफिक जॅम सुवेझ कालव्यात झालंय.

    इजिप्तमधील सुवेझच्या कालव्यातून दररोज शेकडो मालवाहतूक जहाजांची ये-जा होत असते. सर्वसामान्यांसाठी आवश्यक वस्तू आणि इतर साहित्याची वाहतूक समुद्रमार्गे केली जाते. जलवाहतूक हा स्वस्त आणि परवडणारा मार्ग असल्याने अनेक व्यापारी जलमार्गानेच आपला माल दुसऱ्या देशात पोहोचवणे पसंत करतात. मात्र सध्या सुवेझच्या कालव्यात एक मोठं जहाज अडकून पडल्यामुळे ट्रॅफिक जॅम झालंय आणि अनेक छोटीमोठी जहाजंही अडकून पडली आहेत.

    सुजानो एस ए या ब्राझिलच्या कंपनीची जहाजंदेखील या वाहतूक कोंडीत अडकली आहेत. सुजानो एसए ही टॉयलेट पेपर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा जगभर वितरित होणारा माल हा अगोदर जलमार्गाने पोहोचवला जातो. मात्र ही जहाजंच अडकून पडल्यामुळं लवकरच जगभरात टॉयलेट पेपरचा तुटवडा भासायला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाल्याने कंपनीनं उत्पादनही कमी केलंय. त्यामुळे कंपनीच्या गोडाऊनमध्येही माल तयार नाही. सुवेझच्या कालव्यात अडकलेली जहाजं लवकर निघाली नाहीत, तर पर्यायी व्यवस्था तातडीने तयार होणार नसल्याने टॉयलेट पेपरचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

    तब्बल ४०० मीटर कंटेनर सुवेझ कालव्यात अडकून पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक अडली आहे. हा कंटेनर काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात अद्याप यश आलेलं नाही.