काबूल विमानतळ स्फोटात आश्चर्यकाररित्या बचावले ‘इतके’ भारतीय ;  जाणून  घ्या आकडेवारी

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील राजधानीच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या स्फोटाच्या काही तासांपूर्वी काल रात्री सुमारे १४५अफगाण शीख आणि १५ हिंदू घटनास्थळी उपस्थित होते.

    काबूल: अफगाणिस्तामध्ये काबूल येथील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kabul Airport) झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात ८०  हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. या हिंसक स्फोटाची जबाबदारी आयएसआयएस-खुरासाना (ISIS-K) दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. अशातच या हल्ल्या दरम्यान अफगाणिस्तानमध्ये अडकलेले १६० शीख आणि हिंदू नागरिक आश्चर्यकारक रित्या बचावले आहेत. या शीख लोकांनी एका गुरुद्वारामध्ये आश्रय घेतल्याने हे लोक थोडक्यात बचावले असल्याची माहिती दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

    मनजिंदर सिरसा ट्विटवर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ”आज काबूल विमानतळावर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच ठिकाणी हे नागरिक काल उभे होते. आम्ही देवाचे आभार मानतो की काल असे काही घडले नाही.” अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील राजधानीच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या स्फोटाच्या काही तासांपूर्वी काल रात्री सुमारे १४५अफगाण शीख आणि १५ हिंदू घटनास्थळी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात तालिबान्यांनी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी काही मदत मिळतेय का याची पहाणी करण्यासाठी हे लोक विमातळाजवळच्या या परिसरामध्ये एकत्रित जमा झाले होते.”

    मात्र तिथे काहीच मदत मिळण्याची शक्यता दिसली नाही. म्हणून हे लोक परतले आणि त्यानंतर काही तासातच विमानतळावर स्फोट झाले. गुरुवारी रात्री विमानतळ परिसरात झालेल्या स्फोटात लहान मुलांसह महिलांचाही मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.