तालिबानकडून भारताला मोठा धक्का, आयात-निर्यातीवर घातली बंदी

अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. असं डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं आहे. 

    अफगाणिस्तान: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर शेजारी आणि इतर देशांसोबतचे संबंध हळूहळू बदलू लागले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र असल्यामुळे तालिबानने सत्तेवर येताच, भारतासोबतची आयात आणि निर्यात रोखली आहे.

    Import-Export बाबतची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉ. अजय सहाई यांनी दिली आहे.तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. तसेच देशातून होणारी आयात सुद्धा रोखण्यात आली आहे.