संगीत आणि महिलांच्या आवाजावर तालिबानची डोम कावळ्यासारखी नजर, टीव्ही आणि रेडिओसाठी जारी केला हुकूम

१५ ऑगस्टनंतर तालिबानचं सरकार आल्यानंतर अनेक मीडिया माध्यमांनी आपल्या कामावरून महिलांना काढून टाकलं आहे. काबुलमध्ये स्थानिक प्रसार माध्यम आणि वृत्त संस्थांनी अनेक महिला स्टाफला कामावरून काढून टाकलं आहे.

    अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर त्यांची नवनवीन रूप समोेर येत आहेत. तालिबान्यांच्या नियम आणि कायद्यानुसार संगीत आणि महिलांच्या आवाजावर पाबंदी लावण्यात आली आहे. तसेच टीव्ही आणि रेडिओसाठी सुद्धा संगीत आणि महिलांच्या आवाजावर बंदी घालण्यात आली आहे.

    दिवसागणिक होतेय कठिण परिस्थितीत वाढ

    तालिबानने दिलेल्या आश्वासनानुसार, महिलांना काम करायची परवानगी आहे. तसेच इस्लामी कायद्यांनुसार महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. परंतु काही प्रसारमाध्यमांंनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात महिलांच्या बाबतीत काही कठोर नियम आणि कायदे तयार करण्यात आल्याचं समजलं जात आहे. महिलांचं जगणं येथे कठिण झालं आहे. काबुल विमानतळावर हिजाब न घातलेल्या महिलेवर गोळी चालवण्यात आली होती. तर एका महिलेनी चप्पल घातली असता, तिचे पाय दिसताच तिला फटकावण्यात आलं होतं.

    यापूर्वीही महिलांवर करण्यात आले क्रूर अत्याचार

    १५ ऑगस्टनंतर तालिबानचं सरकार आल्यानंतर अनेक मीडिया माध्यमांनी आपल्या कामावरून महिलांना काढून टाकलं आहे. काबुलमध्ये स्थानिक प्रसार माध्यम आणि वृत्त संस्थांनी अनेक महिला स्टाफला कामावरून काढून टाकलं आहे. तालिबानने आपल्या आधीच्या कार्यकाळात सुद्धा महिलांशी अन्यायकारक वागणूक दिल्याबद्दल कुप्रसिद्ध आहे. त्यावेळी महिलांना आपल्या पतीसोबतच बाहेर जाण्याची अनुमती देण्यात आली होती. तसेच त्यांना आपलं संपूर्ण शरीर झाकून ठेवावं लागतं होतं.