तालिबानकडून पत्रकारला मारहाण, हत्या करण्याची आल्याची अफवा ; समोर आलं ‘हे’ कारण?

तालिबाकडून मारहाण करण्यात आलेल्या पत्रकारचं नाव झियार याद (Ziar Yad) असं आहे. काबुलमध्ये हाजी याकूब या परिसरात कव्हरेज करण्यादरम्यान, टोलो वृत्तसंस्थेच्या (Tolo News)  रिपोर्टरला आणि फोटोग्राफरला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे.

    काबुल: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानकडून (Taliban)  कब्जा करण्यात आल्यानंतर अनेक लोकांवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये काही नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. तर काही नागरिक अद्यापही अफगाणिस्तानातून पळ काढण्यासाठी मार्ग शोधत आहेत. दरम्यान, आता तालिबानकडून टोलो वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला मारहाण करण्यात आली असून हत्या करण्यात आल्याची अफवा सुद्धा नागरिकांकडून उठवण्यात आली आहे. परंतु या पत्रकाराने स्वत: ट्विटच्या माध्यमातून मोठा खुलासा केला आहे.

    पत्रकारला बंदुकीच्या साहाय्याने मारहाण

    तालिबाकडून मारहाण करण्यात आलेल्या पत्रकारचं नाव झियार याद (Ziar Yad) असं आहे. काबुलमध्ये हाजी याकूब या परिसरात कव्हरेज करण्यादरम्यान, टोलो वृत्तसंस्थेच्या (Tolo News)  रिपोर्टरला आणि फोटोग्राफरला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. परंतु रिपोर्टर जियार याद यांची हत्या करण्यात आल्याची अफवा काही लोकांकडून पसरवण्यात आली होती. या अफवेबद्दल जियार यांनी स्वत: ट्विट करून खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

    जियार याद यांनी ट्विटरद्वारे सांगितलं की, तालिबान्यांकडून माझी हत्या करण्यात आल्याची चुकूची माहिती पसरवण्यात आली आहे. तसेच मला बंदूकीच्या पुढच्या नोकीने मारण्यात आलं आहे. रिपोर्टिंगच्या वेळी काबुलच्या न्यू सिटीमध्ये तालिबानकडून मला मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

    पुढे सांगितलं की, याचदरम्यान माझा कॅमेरा, तांत्रिक उपकरणे आणि वैयक्तिक मोबाईल फोन सुद्धा हायजॅक करण्यात आला आहे. काही लोकांकडून माझ्या हत्येची बातमी पसरवण्यात आली. परंतु ही एकदम चुकूची माहिती असून अफवा पसरवण्यात आली आहे. तालिबानकडून एका बख्तरबंद लँड क्रूझर बाहेर काढण्यात आलं आणि बंदुकीच्या पुढच्या नोकीने मला मारण्यात आल्याचं झियार यादने सांगितलं आहे.