काबुलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीवर तालिबानचा बेधुंद गोळीबार, पत्रकाराला अटक

 राजधानी काबुलमध्ये (Kabul) पाकिस्तानविरोधात निदर्शनं (Anti Pakistan Rally) करणाऱ्यांवर तालिबान्यांनी गोळीबार केला. निरपराध, शांतता मार्गाने विरोध करणाऱ्यांवर बेछूट गोळिबार करण्यात आला असून अनेक महिला आणि मुलंही जखमी झाल्याचं समजलं जात आहे. तालिबानी कट्टरवाद्यांना (Taliban) साथ देणाऱ्या आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या पाकिस्तानविरोधात अफगाणी नागरिकांनी आंदोलन केलं.

    काबुल:  अफगाणिस्तानवर (Afghanistan crisis) तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर दरदिवशी विविध प्रकारच्या घटना घडत असतात. आज पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे काबुलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीवर तालिबानचा बेधुंद गोळीबार करण्यात आली असून कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

    राजधानी काबुलमध्ये (Kabul) पाकिस्तानविरोधात निदर्शनं (Anti Pakistan Rally) करणाऱ्यांवर तालिबान्यांनी गोळीबार केला. निरपराध, शांतता मार्गाने विरोध करणाऱ्यांवर बेछूट गोळिबार करण्यात आला असून अनेक महिला आणि मुलंही जखमी झाल्याचं समजलं जात आहे. तालिबानी कट्टरवाद्यांना (Taliban) साथ देणाऱ्या आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या पाकिस्तानविरोधात अफगाणी नागरिकांनी आंदोलन केलं. तालिबानी अंमलातल्या अन्यायी नियमांमुळे चिडलेल्या महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

    अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतच्या महिलांनी देशाच्या आगामी सरकारमध्ये त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. एका महिला संघटनेचं म्हणणं आहे की, मागील वीस वर्षांमध्ये महिलांच्या योगदानाला मान्यता देण्याचा हाच एक मार्ग आहे. प्रदर्शनकारी महिलांनी सांगितले की, अफगाण महिलांना सरकारमध्ये सक्रिय समानता मिळाली पाहीजे, नवीन सरकार महिलांशिवाय बनवण्यात काहीही अर्थ नाहीये.

    पंजशीरचा पाडाव झाल्यानंतर आता अफगाणिस्तानवर तालिबानी सत्तेचा अंमल पक्का झाला आहे. पाकिस्तान, ISI तालिबान्यांच्या बरोबरीने लढाईत उतरले आहेत. त्यामुळे आता अफगाणी नागरिकांमध्ये पाकविरोधात असंतोष वाढला आहे. पाकिस्तानमुळेच तालिबानी सत्ता अफगाणिस्तानमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे.