afganistan

तालिबानच्या(Taliban) कोरोना लसीकरणविरोधी(Corona Vaccination) भूमिकेमुळे अफगाणिस्तानबरोबरच(Afganistan) शेजारच्या देशांमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

    काबूल : अफगाणिस्तानवर(Afganistan) तालिबानने ताबा(Taliban In Power) मिळवला आहे. अनेक जण त्यामुळे देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानमध्ये कोरोनासंदर्भातील(Corona Related Rules) नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्वात भयानक बाब अफगाणिस्तानमध्ये लसीकरणाला पूर्णविराम लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानमधील कोरोना लसीकरणाची टक्केवारी अवघी ०.६ टक्के इतकी आहे. जगभरामध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्यांची हीच टक्केवारी २३.६ टक्के इतकी आहे. तालिबानने मागील आठवड्यामध्ये पाक्तिका प्रांतामधील लसीकरण केंद्र बंद करुन लसीकरणाला विरोध केला होता.

    गेल्या आठवड्यामध्येच अफगाणिस्तानला जागतिक कोरोनाविरोधी मोहिमेअंतर्गत जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीच्या १.४ मिलियन कोरोनाच्या लसी देण्यात आल्या होत्या. गेल्या आठ महिन्यांमध्ये अफगाणिस्तानमध्ये कोरोनाचे १ लाख ५२ हजार १४२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ७ हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

    तालिबानच्या कोरोना लसीकरणविरोधी भूमिकेमुळे अफगाणिस्तानबरोबरच शेजारच्या देशांमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका व्यक्त होत आहे.
    जगभरातील ज्या देशांमध्ये अद्याप पोलिओची समस्या मोठा प्रश्न म्हणून पाहिलं जातं त्यामध्ये अफगाणिस्तानचा समावेश आहे. २०१८ पासून येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ज्या भागांमध्ये तालिबानचे वर्चस्व आहे त्या ठिकाणी त्यांनी दारोदारी जाऊन लहान मुलांचं लसीकरण करण्यावर बंदी आणली आहे.

    कोरोना लॉकडाऊनमुळे पोलिओ मोहिमेला मोठा फटका बसला आहे. त्यातच आता संपूर्ण देशात तालिबानचं राज्य आल्याने पोलिओविरुद्धच्या मोहिमेमध्ये देश काही दशकं मागे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २०२० मध्ये येथे ५६ बालकांना पोलिओची लागण झाल्याचं दिसून आलं होतं. ग्लोबल पोलिओ एज्युकेशन इनिशिएटीव्हच्या आकडेवारीनुसार हा पोलिओचा संसर्ग वाइल्ड म्हणून लोकसंख्येनुसार पसरणारा किंवा लसीकरणाच्या अभावामुळे पसरणारा आहे.