अफगाणिस्तानात मुला-मुलींच्या एकत्र शिक्षणाबाबत तालिबानचा पहिला फतवा जारी

अफगाणिस्तानात सध्या संयुक्त शिक्षण प्रणाली सुरु आहे. यात मुलं-मुली एकत्र बसून शिक्षण घेतात. परंतु यापुढे अशा शिक्षण व्यवस्थेस मान्यता नाही. मुलं-मुली यांच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था असाव्यात. महाविद्यालयाचे मालक, संस्थाचालक आणि तालिबानी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ३ तासांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    काबुल – अफगाणिस्तानवर तालिबानींनी कब्जा केल्यानंतर मुलामुलींच्या एकत्र शिक्षणाबाबत पहिला फतवा जारी केला आहे. अफगाणिस्तानात मुली मुलांसोबत एकाच वर्गात बसणार नाहीत असा आदेश अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयांना तालिबानी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

    अफगाणिस्तानात सध्या संयुक्त शिक्षण प्रणाली सुरु आहे. यात मुलं-मुली एकत्र बसून शिक्षण घेतात. परंतु यापुढे अशा शिक्षण व्यवस्थेस मान्यता नाही. मुलं-मुली यांच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था असाव्यात. महाविद्यालयाचे मालक, संस्थाचालक आणि तालिबानी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ३ तासांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    हेरात प्रांताच्या अधिकाऱ्यांनी तर्क दिलाय की, सरकारी शाळा आणि खासगी संस्था विविध वर्गाचं आयोजन करु शकतात. परंतु खासगी संस्थांनी विद्यार्थिंनीची संख्या मर्यादित ठेवावी जेणेकरुन विविध वर्गात त्यांना शिक्षण घेता येईल.