तालिबानचा अमेरिकेसोबत करार, 31 ऑगस्टपर्यंत नवीन सरकार स्थापन करण्याचे संकेत ?

तालिबानने अमेरिकेसोबत केलेल्या करारानुसार, अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत देशातून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत तालिबान अमेरिकेच्या निर्णयाची प्रतिक्षा करणार आहेत. अशी माहिती तालिबानशी चर्चा करणाऱ्या एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर एका वृत्तपत्राला सांगितले. 

    अफगाणिस्तानात तालिबानने संपूर्ण कब्जा केल्यानंतर आता 31 ऑगस्टपर्यंत नवीन सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालिबानने अमेरिकेसोबत केलेल्या करारानुसार, अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत देशातून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत तालिबान अमेरिकेच्या निर्णयाची प्रतिक्षा करणार आहेत. अशी माहिती तालिबानशी चर्चा करणाऱ्या एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर एका वृत्तपत्राला सांगितले.

    तालिबानचे आघाडीचे वार्ताहर अनस हक्कानी यांनी माजी सरकारी वार्ताहरांना सांगितलं की, तालिबानचा अमेरिकेबरोबर करार आहे. जोपर्यंत अमेरिका आपलं सैन्य अंतिम तारखेपर्यंत मागे घेणार नाही, तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही.  अशी प्रकारची माहिती अफगाणिस्तानच्या एका अधिकार्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितले आहे.