तालिबानी ‘राज’ सुरु :  महिलांसाठी बनविले १० क्रुर नियम ; हिल्सच्या चप्पल, नेलपेंट वापरल्यास कापले जाणार अवयव

तालिबानने येथे पुन्हा शरिया कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  शरिया कायद्यात महिलांसाठी अत्यंत कठोर आणि अमानुष कायदे नियम आहेत. या कायद्यामुळे मानवाधिकारचं उल्लंघन होत असून महिलांचे अधिकार हिरावून घेतले जातात.

    अफगाणिस्तानवर दहशतवादी संघटना तालिबानने ताबा मिळवला आहे. मात्र या तालिबान्यांच्य क्रूरतेमुळे  तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतेय. तालिबान्यांनी अफगानात अनेक नवे आणि क्रूर नियम लागू केले आहेत. तालिबानी राजवटीमध्ये एवढ्या भयानक निर्बंधामध्ये महिलांना जीवन जगणं अत्यंत असह्य होणार आहे.
    अफगाणिस्तानवर  २००१ पूर्वीही  तालिबान सत्तेवर असताना महिलांवर खूप अमानुष अत्याचार करण्यात आले. त्यामुळे येथील महिला अजून भयभीत झाल्या आहेत. तालिबान्यांनी बनविलेले नियम येथील  महिलांना दैनंदिन जीवन जगताना पाळावे लागतात. तसेच नियम न पाळणाऱ्या महिलांना कठोरातली कठोर शिक्षा सुनावली जाते. तसे न करणाऱ्याची हत्याही करण्यात येते.
    तालिबानने येथे पुन्हा शरिया कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  शरिया कायद्यात महिलांसाठी अत्यंत कठोर आणि अमानुष कायदे नियम आहेत. या कायद्यामुळे मानवाधिकारचं उल्लंघन होत असून महिलांचे अधिकार हिरावून घेतले जातात.
    हे आहेत तालिबान्यांचे महिलांसाठीचे १० क्रुर नियम:
    १. महिलांनी बोटांना नेलपेंट लावणे गुन्हा, तसेच स्वच्छेने लग्न केल्यास कठोर शिक्षा
    २. महिलांना घराबाहेर पडताना बुरखा घालणं बंधनकारक आहे.
    ३. सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांना महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये
    ४. महिलांना नातेवाईकांकडे जाण्यासाठी सोबत वडील, भाऊ, पती किंवा पुरुष असणे गरजेचं असतं.
    ५. पुरुषांना महिलांच्या चालण्याचा किंवा पावलांचा आवाज ऐकू येऊ नये यासाठी महिलांना हाय हिल्स सँडल्स घालण्यास बंदी आहे.
    ६. कोणत्याही ठिकाणाच्या नावात महिलेचे नाव असल्यास तो काढून काढणे बंधनकारक
    ७. बाहेरच्य़ा अनोळखी व्यक्ती पाहू नये यासाठी महिलांना बाल्कनी किंवा खिडकीतही उभं राहण कायद्याने गुन्हा
    ८. सार्वजनिक कार्यक्रमांपासून महिलांना मज्जाव
    ९. घरातील महिलांना कोणी पाहू नये यासाठी तळमजल्यावरील घरांच्या खिडक्या पारदर्शन नसाव्यात. त्यावर रंग असावा.
    १०. महिलांना फोटो काढण्यास बंदी, तसेच वर्तमान पत्र, पुस्तकात महिलांचे फोटो छापणेही गुन्हा, घरात फोटो लावण्यास बंदी
    नियम न पाळणाऱ्या महिलांसाठी तालिबनाच्या क्रुर शिक्षा
    १) व्यभिचार आणि अनैतिक संबंधांसाठी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण
    २) तंग कपडे घातल्यास हत्या केली जाते किंवा कठोर शिक्षा सुनावला जाते.
    ३) लग्नास नकार देत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचे नाक किंवा कान छाटले जाते.
    ४) नेलपेंट लावल्यास बोटं कापली जातात.