अफगाणिस्तानमध्ये महिला सुरक्षित नाहीच, घरून काम करण्याचा तालिबानचा सल्ला

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)महिलांनी कामावर जाऊ नये, शक्य असेल तर घरूनच काम करावे(Women Should Work From Home) असं तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेमध्ये(Press Conference Of Taliban  Spokesperson) सांगितलं आहे.

    अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)सध्या महिला सुरक्षित(Women Safety) नाहीत, असं तालिबानने(Taliban) मान्य केले आहे. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)महिलांनी कामावर जाऊ नये, शक्य असेल तर घरूनच काम करावे(Women Should Work From Home) असं तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेमध्ये(Press Conference Of Taliban  Spokesperson) सांगितलं आहे. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडू नये.त्याचवेळी महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार दिले जातील, असंही सांगण्यात आलं आहे.

    याआधी १९९६ ते २००१ च्या दरम्यान तालिबानची सत्ता होती. त्यावेळी तालिबानने महिलांना कामाच्या ठिकाणी बंदी घातली होती. तसेच त्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली होती. बुरखा घालणं बंधनकारक केलं होतं. जागतिक बँकेने अफगाणिस्तानमधील निधी थांबवल्यानंतर, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करून आणि तालिबानच्या ताब्यात आल्यापासून मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या अहवालांची पारदर्शक आणि त्वरित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर काही तासांच्या आतच तालिबानकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

    दरम्यान, तालिबानने आश्वासन दिलं की ही नवीन सुरुवात आहे. परंतु तालिबान नेत्यांनी महिलांचे हक्क मागे घेतले जाणार नाहीत याची हमी देण्यास नकार दिला आहे. अनेक महिलांना आधीच हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे.