तालिबानची अमेरिकेला धमकी; 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडा

सैन्य माघारीसाठी एकही दिवस वाढवून मिळणार नाही, असेही शाहीनने ठणकावले. यापूर्वी अमेरिकेने सैन्य माघारीसाठी 11 सप्टेंबर हा शेवटचा दिवस ठरवला होता. मात्र, त्यानंतर हा दिवस 31 ऑगस्ट करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आवश्यकता भासल्यास आणखी काही दिवस अमेरिकन सैन्य काबूलमध्ये राहू शकते असे वक्तव्य केले होते. त्यावर तालिबानने प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेरिकेला धमकी दिली आहे.

    काबूल : अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत सैन्य माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्य माघारी घ्यावे अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकी तालिबान प्रवक्ते सुहैल शाहीनने दिली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी 31 ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. त्यानंतर एकाही दिवसाची वाढीव मुदत मिळणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे.

    सैन्य माघारीसाठी एकही दिवस वाढवून मिळणार नाही, असेही शाहीनने ठणकावले. यापूर्वी अमेरिकेने सैन्य माघारीसाठी 11 सप्टेंबर हा शेवटचा दिवस ठरवला होता. मात्र, त्यानंतर हा दिवस 31 ऑगस्ट करण्यात आला.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आवश्यकता भासल्यास आणखी काही दिवस अमेरिकन सैन्य काबूलमध्ये राहू शकते असे वक्तव्य केले होते. त्यावर तालिबानने प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेरिकेला धमकी दिली आहे.

    अफगाणिस्तानमध्ये आणखी काही दिवस सैन्य काबूलमध्ये तैनात करण्याची आवश्यकता असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. जॉन्सन यांनी याच मुद्यावर जी-7 देशांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. अजूनही बचाव कार्य पूर्ण झाले नसल्याचेही जॉन्सन यांनी म्हटले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]