Taliban Update: 9/11 Memorial Day Taliban sworn in; America will rub salt on its wounds

अमेरिकेवरील हा हल्ला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जातो. याच हल्ल्याला येत्या 11 सप्टेंबर रोजी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तालिबानकडून याच दिवशी सरकार स्थापनेची घोषणा करुन कडक इशारा देण्याचा तालिबानी नेत्यांचा मानस आहे.

  काबुल : बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविलेल्या तालिबानने सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. येत्या 11 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला होता.

  अमेरिकेवरील हा हल्ला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जातो. याच हल्ल्याला येत्या 11 सप्टेंबर रोजी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तालिबानकडून याच दिवशी सरकार स्थापनेची घोषणा करुन कडक इशारा देण्याचा तालिबानी नेत्यांचा मानस आहे.

  महिला मंत्री होऊ शकत नाहीत

  तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक फतवे काढत आहे. महिलांसंदर्भात तालिबानची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. तालिबाने यापूर्वी अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता तालिबाने महिलांना मंत्री न बनविण्याचा निर्णय घेतला आहे. महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी फक्त मुलांना जन्म द्यावा, असे तालिबानचा प्रवक्ता सय्यद जकारुल्लाह हाशिमी याने म्हटले आहे. एक महिला मंत्री होऊ शकत नाही , हे असे होईल की तुम्ही त्यांच्या गळ्यात काहीतरी टाकले जे त्या घेऊ शकत नाहीत. महिलांचे मंत्रिमंडळात असणे आवश्यक नाही. त्यांनी मुलांना जन्म द्यावा. तसेच अफगाणिस्तानातील महिला आंदोलक देशातील सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, असे हाशिमीने म्हटले आहे.

  आश्वासनांचा सन्मान करा : भारत

  यापूर्वी, सरकारमध्ये महिलांनाही संधी दिली जाईल, असे तालिबानने म्हटले होते. मात्र, आता तालिबानने घेतलेल्या भूमिकेला भारताने प्रखर विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी तालिबानने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सन्मान करावा, असा सल्ला दिला आहे. तिरूमूर्ती म्हणाले की, अफगाणिस्तानमधील महिलांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता आहे. तिथल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करणे आणि अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्व वर्गांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्वसमावेशक व्यवस्थेसाठी भारताने आवाहन केले आहे. सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण झाल्यास त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मान्यता मिळेल असेही तिरुमूर्ती यांनी सांगितले.

  सालेह यांच्या भावाचा मत्यू

  पंजशीरमध्ये तालिबान आणि नॅशनल रेझिस्टंस फोर्समध्ये घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये अफगाणिस्तानचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहूल्ला सालेह याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. तालिबानी दहशतवाद्यांनाही मोठे नुकसान झेलावे लागल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी रात्री तालिबान आणि सालेह समर्थकांमध्ये भीषण युद्ध झाले. यामध्ये रोहल्‍ला सालेहचा मृत्यू झाला. तालिबानचा दावा आहे की, सालेह यांनी ज्या लायब्ररितून काही दिवसांपूर्वी व्हीडिओ प्रसारित केलेला त्या लायब्ररीपर्यंत ते पोहोचले आहेत.