Taliban uprising in Kabul; Hit the women with tear gas canisters

शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही अफगाणि महिला रस्त्यावर उतरल्या. या महिलांच्या हातात मागण्यांचे फलक होते. त्या घोषणा देत होत्या. शिक्षण आणि नोकरी सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी या महिलांची मागणी आहे.

    काबुल : काबुलमध्ये शनिवारी महिला करत असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाकडे जाणाऱ्या महिला आंदोलकांना तालिबानने रोखले आणि त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलनादरम्यान अनेक महिला जखमी झाल्या.

    शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही अफगाणि महिला रस्त्यावर उतरल्या. या महिलांच्या हातात मागण्यांचे फलक होते. त्या घोषणा देत होत्या. शिक्षण आणि नोकरी सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी या महिलांची मागणी आहे.

    मताधिकार, प्रशासनात प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी सुद्धा अफगाणि महिला प्रयत्नशील आहेत. शिक्षण हा त्यांचा मुख्य चिंतेचा विषय आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येणार आहे. त्यांच्यापासून सर्वाधिक धोका महिलांनाच आहे. कारण यापूर्वीच्या राजवटीत तालिबानने महिलांचे हक्क, अधिकार दडपून टाकले होते.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]