sher stanikjai

तालिबान(Taliban) पाकिस्तानच्या मदतीनं भारताला लक्ष्य करू शकतं का ? याबाबत स्टॅनिकझाई(Stanikzai) यांनी म्हटलं की, प्रसिद्ध होणाऱ्या काही बातम्या खोट्या असतात. आम्ही असं विधान कधीही केलं नाही. भारतावर हल्ल्याचे काही संकेतही दिले नाहीत. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत.

    काबूल : तालिबानचा प्रमुख शेर मोहम्मद स्टॅनिकझाई (Sher Mohammad Stanikzai) यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधाबाबत भाष्य केलं आहे. भारत आणि पाकिस्ताननं त्यांच्यामधील अंतर्गत गोष्टींसाठी अफगाणिस्तानचा वापर करु नये. दोन्ही देशात असलेल्या सीमेवर ते एकमेकांशी लढू शकतात. यामध्ये आम्हाला खेचण्याची गरज नाही, अशा आशयाचं वक्तव्य स्टॅनिकझाई यांनी केलं आहे.

    तालिबान(Taliban) पाकिस्तानच्या मदतीनं भारताला लक्ष्य करू शकतं का ? याबाबत स्टॅनिकझाई(Stanikzai) यांनी म्हटलं की, प्रसिद्ध होणाऱ्या काही बातम्या खोट्या असतात. आम्ही असं विधान कधीही केलं नाही. भारतावर हल्ल्याचे काही संकेतही दिले नाहीत. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत.

    ते पुढे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून असलेल्या भौगोलिक आणि राजकीय संघर्षाची जाणीव आम्हाला आहे. पण तालिबानला आशा आहे की, दोन्ही देश आपल्या अंतर्गत प्रश्नांसाठी अफगाणिस्तानचा वापर करणार नाहीत. दोन्ही देशात एक लांब सीमा रेषा आहे. दोन्ही देश आपापल्या सीमेवर लढू शकतात. अफगाणिस्तानला मध्ये आणण्याची गरज नाही. आमची जमीन आम्ही कोणत्याही देशाला वापरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.