अमेरिकेची पाठ फिरताच तालिबान्यांचा पंजशीरवर हल्ला, मिळाले जशास तसे उत्तर – ८ तालिबानी ठार

अफगाणिस्तानातून(Afghanistan) अमेरिका बाहेर पडल्यावर तालिबानी(Attack On panjshir By Taliban) लढाऊंनी पंजशीरवर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात तालिबानला मोठे नुकसान झाले. तालिबानला सडेतोड उत्तर मिळाले.

    अफगाणिस्तानातून(Afghanistan) अमेरिका बाहेर पडल्यावर तालिबानी(Attack On panjshir By Taliban) लढाऊंनी पंजशीरवर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात तालिबानला मोठे नुकसान झाले. तालिबानला सडेतोड उत्तर मिळाले. यामध्ये ८ तालिबानी ठार झाले आहेत. तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सने दावा केला आहे की, सोमवारी रात्री तालिबानने पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि या लढाईत ८ तालिबानी मारले गेले. पंजशीर हा एकमेव प्रांत आहे जो अजून तालिबानच्या ताब्यात नाही.

    नॉर्दर्न अलायन्सचे देखील २ लोक मारले गेले आहेत. तालिबानने संपूर्ण देश काबीज केला आहे. मात्र तो अजून पंजशीरवर नियंत्रण मिळवू शकलेला नाही. येथे अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली उत्तर आघाडीच्या लढवय्यांनी तालिबानविरुद्ध युद्ध पुकारले आहे. शेर-ए-पंजशीर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली उत्तर आघाडीने तालिबानच्या विरोधात युद्ध फुकारले आहे. गेल्या काही दिवसात तालिबानने अनेक वेळा येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले. असा दावा केला जात होता की येथे सुमारे ३०० तालिबानी मारले गेले होते.

    दोन्ही बाजूंनी चर्चा करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तालिबानने अलीकडेच दावा केला होता की, ते पंजशीरच्या लोकांशी बोलत आहेत त्याचवेळी, नॉर्दर्न अलायन्सचे अहमद मसूद यांनी स्पष्ट केले होते की, ते तालिबानशी चर्चेसाठी तयार आहेत. सरकार स्थापनेसंदर्भात देखील होईल. पण जर तालिबानला युद्ध हवे असेल तर युद्धही केले जाईल.