तालिबान्यांचा नवा फतवा, अफगाणिस्तानच्या नागरिकांना देशाबाहेर जाण्यास बंदी

तालिबान्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद(Press Conference By Taliban) घेतली. यावेळी तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद म्हणाला की, यापुढे अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाऊ दिलं जाणार नाही.

    अफगाणिस्तानमधली(Afghanistan) स्थिता सध्या खूप भयावह आहे. तालिबान्यांनी(Taliban Order To Afghani People) अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यामुळे सगळ्या जगाला या देशाची चिंता आहे. अशातच तालिबानी रोज वेगवेगळे फतवे(Taliban Order) काढत आहेत. तालिबान्यांनी नुकतीच एक नवी घोषणा(Declaration) दिली आहे. तालिबान्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद म्हणाला की, यापुढे अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाऊ दिलं जाणार नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, या विमानतळाकडे जाणारा रस्ता अफगाण नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, इतर देशातील नागरिक या रस्त्याने जाऊ शकतात. तसेच आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे. तालिबानने सांगितलं की, अफगाण नागरिक बाहेर जाऊ लागल्याने आम्हीही नाखूश आहोत. इथल्या डॉक्टरांनी तसंच शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासकांनी देश सोडून जाऊ नये. त्यांनी इथेच राहून आपापल्या क्षेत्रात काम करावं, असं सांगण्यात आलं आहे.