tanzania president

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष (Tanzania President) समिया सुलुहु हसन (Samia Suluhu Hassan) यांनी महिला फुटबॉलपटूंच्या ‘सपाट छाती’बाबत (Flat Chest) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

    टांझानिया : प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी समान संधीची दारे खुली होत आहेत. अशा आधुनिक काळात महिलांवर शारीरिक वैशिष्ट्यांवरून एखाद्या देशाच्या महिला राष्ट्राध्यक्षांकडून टीका होत असेल तर ती खूप दुर्दैवी बाब आहे. टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष (Tanzania President) समिया सुलुहु हसन (Samia Suluhu Hassan) यांनी महिला फुटबॉलपटूंच्या ‘सपाट छाती’बाबत (Flat Chest) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.अनेक जण त्यांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करुन निषेध करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्टला एका प्रादेशिक फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत (Regional Football Championship) राष्ट्रीय पुरुष संघाच्या (National Men Team) विजय समारंभात बोलताना समिया सुलुहु हसन म्हणाल्या की, ‘ज्यांची छाती सपाट आहे, ते पुरुष आहेत त्या महिला नाहीत, असं तुम्हाला वाटेल. पण तुम्ही त्यांचे चेहरे बघितले तर आश्चर्य वाटेल. कारण तुम्हाला लग्न करायचे असेल आणि आकर्षक स्त्री हवी असेल पण त्या तशा नसतील. महिला फुटबॉलपटूंमधून ‘ते’ गुण नाहीसे झाले आहेत.’

    ‘जेव्हा त्या देशासाठी ट्रॉफी आणतात तेव्हा एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटतो; परंतु भविष्यात त्यांचे आयुष्य पहाल, तर खेळून खेळून पाय थकले असतील आणि त्यांच्याकडे खेळायला ताकद नसेल. त्यांचे आयुष्य काय असेल?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘त्यांच्यासाठी लग्न होणं हे स्वप्नासारखं आहे. कारण तुमच्यापैकी कोणीही त्यांना तुमची पत्नी म्हणून घरी घेऊन गेलात तरी तुमची आई विचारेल की ती स्त्री आहे की सहकारी पुरुष.’ असंही त्या म्हणाल्या. हसन यांच्या महिला फुटबॉलपटूंबद्दलच्या (Female Football Players) वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यांच्याविरुद्ध टीकेची एकच झोड उठली.