कारच होती या वयोवृद्ध शिक्षकाचं घर, माजी विद्यार्थ्यांनी केला असा जुगाड अन् चमत्कारच झाला

अवघ्या विश्वातल्या लोकांचं जीवन कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे. प्रत्यक्षात कॅलिफोर्नियातील एक शिक्षक Jose २०१३ पासून आर्थिक तंगीमुळे पर्यायच नसल्याने नाईलाजाने त्यांना कारमध्येच राहावं लागत होतं. पण, त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली कारण कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद पडल्या.

  जोस विलालरुएल (Jose Villarruel) पेशाने शिक्षक असून एक ट्यूटर आहेत, जे बऱ्याच काळापासून आपलं आयुष्य कारमध्येच जगत आहेत. म्हणजेच, त्यांची १९९७ ची कार हेच त्यांचं घर आहे. ते १९९७ च्या Ford Thunderbird LX कारचा दरवाजा जेव्हा उघडतात त्यावेळी तो जोरात बंद करणार याकडे आवर्जून लक्ष देतात एवढंच नव्हे तर त्यांना लॅपटॉप चार्ज करण्यासाठीही कारच्या बॅटरीवरच अवलंबून राहावं लागत आहे. पण या शिक्षकाच्या ७७ व्या वाढदिवशी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांना अशी भेट दिली की, यांचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं हे प्रकरण कॅलिफोर्नियातील फोंटाना शहरातलं आहे.

  कोरोना काळात करावा लागला अडचणींचा सामना

  अवघ्या विश्वातल्या लोकांचं जीवन कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे. प्रत्यक्षात कॅलिफोर्नियातील एक शिक्षक Jose २०१३ पासून आर्थिक तंगीमुळे पर्यायच नसल्याने नाईलाजाने त्यांना कारमध्येच राहावं लागत होतं. पण, त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली कारण कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद पडल्या. पैशांच्या तंगीमुळे त्यांना रोजचा चरितार्थ चालवतानाही नाकीनऊ आले होते. कारण हेच होतं की, त्यांच्या कमाईचा अधिकाधिक हिस्सा त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांना पाठवावा लागत होता.

  विद्यार्थ्यांनी केली पैशांची जुळवाजुळव

  माजी विद्यार्थी Steven Nava ने सांगितलं, ऑफिसला जात असताना हा वयोवृद्ध शिक्षक दररोज सकाळी त्याच्या २४ वर्ष जुन्या कारच्या डिक्कीतून त्याने जीवनावश्यक वस्तू बाहेर काढताना पाहात असे. तेव्हाच मी ठरवलं की, मला या शिक्षकांसाठी काहीतरी करायला हवं. मी आर्थिक मदत म्हणून एक अकाऊंट सुरू केलं. ५ हजार डॉलर्स (३.६० लाख रुपये)जमवणं हे आमचं लक्ष्य होतं. पण यातून आम्ही ६ पट अधिक पैसे गोळा केले.

  शिक्षकाचा या गोष्टीवर विश्वासच बसेना

  जेव्हा गुरुवारी मिस्टर वी. (Jose Villarruel) यांचा ७७ वा वाढदिवस आला तेव्हा त्यांना या गोष्टीची तिळमात्रही कल्पना नव्हती की, त्यांना एक मोठी भेटच मिळणार आहे. ही त्यांच्यासाठी खूपच आश्चर्याची गोष्टी होती. मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती. तर स्टीवन सांगतो की, अशा व्यक्तीची मदत करणं म्हणजे एखाद्या सन्मानापेक्षाही नक्कीच कमी नाही, ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिलाय.