मोबाईल चार्जिंगला असताना घरावर वीज कोसळली आणि पुढे घडली धक्कादायक घटना..

ही घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लावल्यानंतर ही मुलगी मोबाईलवर बोलत होती. परंतु त्याचक्षणी तिच्या घरावर वीज कोसळल्यामुळे मोबाईलचा मोेठा स्फोट झाला.

  ब्राझील : घरात मोबाईल फोन चार्जिंगला लावला असता घरावर वीज कोसळून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लावल्यानंतर ही मुलगी मोबाईलवर बोलत होती. परंतु त्याचक्षणी तिच्या घरावर वीज कोसळल्यामुळे मोबाईलचा मोेठा स्फोट झाला आणि मुलीचा देखील मृत्यू झाला आहे.

  उत्तर ब्राझीलमधील संतोरम शहराची रहिवासी

  फोन चार्जिंगला लावल्यानंतर ही घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव रडजा फेरेरा डी ऑलिवेरा असं आहे. तर ती उत्तर ब्राझीलमधील संतोरम शहराची रहिवासी आहे. रविवारी पहाटेच्या दरम्यान वीज कोसळून तिचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ऑलिवेराच्या घरावर वीज कोसळली त्यावेळी तिने फोन वापरला होता.

  या घटनेची माहिती तिच्या पालकांना समजली असता, त्यांनी घरातच सर्वप्रथम ऑलिवेरावर उपचार केले. त्यानंतर तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुदैवाने तिला मृत घोषित करण्यात आले.

  ऑलिवेरा ही तिसरी व्यक्ती

  मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिवेरा ही तिसरी व्यक्ती किंवा मुलगी आहे. ज्यामुळे विजेचा झटका बसून तिचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलीयामधील पॅरा राज्यामध्ये एकाच आठवड्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. तसेच गेल्या आठवड्यात अपोलिनारियो जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. सेमेओ तावरेस असं या तरूणाचं नाव आहे.

  वादळाच्या वेळी विजेचा धक्का लागल्यावर सेमेओ तावरेस त्याच्या फोनवर असल्यामुळे त्याला सुद्धा विजेचा जोरदार धक्का बसला. ही घटना बुधवारच्या वेळेस घडली. तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. परंतु त्याला वाचवण्यात यश मिळालं नाही.

  मोबाईल फोन चार्जिंगला लावल्यानंतर कधीही बोलू नये

  दरम्यान, मोबाईल फोन चार्जिंगला लावल्यानंतर मोेबाईलवर कधीही बोलू नये किंवा त्याचा वापर करू नये. अशा प्रकारची माहिती वारंवार देण्यात येत असते. परंतु काही युझर्स याचा गैरवापर करतात आणि निष्काळजीपणात दुर्लक्ष केल्यामुळे अशा मन हेलावणाऱ्या घटना घडतात.