मेक्सिकोमध्ये मेट्रो ट्रेनसहित पूल कोसळला ; भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू , घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मेक्सिको सिटी मेट्रोचा एक पूल कोसळला असून मोठा अपघात झाला आहे. दुर्घटना घडली तेव्हा मेट्रो ट्रेन पुलावरुन जात होती. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात २० लोकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

    मेक्सिको सिटीमध्ये भीषण दुर्घटना झाली आहे. मेक्सिको सिटी मेट्रोचा एक पूल कोसळला असून मोठा अपघात झाला आहे. दुर्घटना घडली तेव्हा मेट्रो ट्रेन पुलावरुन जात होती. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात २० लोकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,  मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली. मेक्सिको सिटीच्या मेयर क्लॉडिया यांनी १५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांचं नुकसान झालं असल्याची माहिती होती. दरम्यान ४९ लोक जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    ही भीषण दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये मेट्रो पूल रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहनांवर कोसळताना दिसत आहे.