The devastation of Taliban atrocities in Afghanistan; What to do with stranded Indians? Five questions before the Modi government

अफगाणिस्‍तानमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांबरोबर स्‍थानिक नागरिक विमानतळाबाहेरील रांगेमध्ये उपाशी उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक हाल हे लहान मुलांचे होत आहेत. उपासमारीमुळे काही मुले बेशुद्ध पडत आहेत. आता नागरिक हतबल झाले आहेत. काबूल विमानतळाबाहेर तब्बल 50 हजारांहून अधिक नागरिकांची गर्दी आहे. प्रचंड गर्दीमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे

    काबुल : तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथील स्थानिक नागरिक भयभीत झाले असून ते मोठ्या संख्येने देश सोडत आहेत. तालिबानच्या दहशतीतून स्वतःची सुटका करण्यासाठी लोक कोणत्याही किंमतीत देशाबाहेर जाण्यास तयार झाले आहेत.

    बहुतांश लोकांनी काबुल विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी जमा केली आहे. त्यातच आता काबुल एअरपोर्टवर नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. पाणी आणि अन्नासाठी ते तळमळ आहेत. याचाच फायदा घेत या नागरिकांची लूट सुरू आहे. विमानतळाबाहेर खाण्यापिण्याचे पदार्थ अव्वाच्या सव्वा किंमतीत विकल्या जात आहेत.

    काबूल विमानतळावर पाण्याच्या बाटलीची किंमत 3000 रुपये आहे तर प्लेटभर राईससाठी 7500 रुपये मोजावे लागत आहेत. इतकेच नाही तर दुकानदार अफगाणी करन्सीऐवजी डॉलर्सची मागणी करत आहेत. दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनचे सैनिक स्थानिक नागरिकांना मदत करत आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीपर्यंत खाण्यापिण्याचे पदार्थ पोहोचवण्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    अफगाणिस्‍तानमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांबरोबर स्‍थानिक नागरिक विमानतळाबाहेरील रांगेमध्ये उपाशी उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक हाल हे लहान मुलांचे होत आहेत. उपासमारीमुळे काही मुले बेशुद्ध पडत आहेत. आता नागरिक हतबल झाले आहेत. काबूल विमानतळाबाहेर तब्बल 50 हजारांहून अधिक नागरिकांची गर्दी आहे. प्रचंड गर्दीमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यापासून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देश आपल्या नागरिकांना काबुलमधून बाहेर काढण्यात गुंतले आहेत. 14 ऑगस्टपासून काबूल विमानतळावरून लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.