अफगाणिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटात डॉक्टरांसह पाच जण ठार

काबूलमध्ये (blast in Kabul) झालेल्या हल्ल्यात चार डॉक्टरांसह पाच (4 doctors and 1 person died)जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

काबूल: अफगाणिस्तानात (Terrorist attack in Afghanistan) दहशतवाद्यांनी यावेळी डॉक्टरांवर हल्ला केला आहे. काबूलमध्ये (blast in Kabul) झालेल्या हल्ल्यात चार डॉक्टरांसह पाच (4 doctors and 1 person died)जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

कधी झाला हल्ला ?

अफगाणिस्तानातील काबूल शहरातील पीडी ७ मधील दोघाबाद येथे सकाळी ७.३३ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुल-ए-चकरी कारागृहात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या वाहनाला बॉम्बद्वारे उडवण्यात आले. घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. इस्तकबाल रुग्णालयाने या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यात एकूण चार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या चार जणांमध्ये तीन महिला डॉक्टरांचा समावेश असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेत वाढ

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये २० डिसेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अतिरेक्यांनी यावेळी खासदार हाजी खान मोहम्मद वरदक यांच्या कारवर निशाणा साधला. आता दोन दिवस पूर्ण न होताच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला आहे.