Thai Prime Minister Bitterley sprayed sanitizer at a press conference

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओचा प्रत्येक आठवड्यात पत्रकार परिषद घेतात. अशाच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत उत्तरे दिली. मात्र, त्याच वेळी एका पत्रकाराने मंत्रिमंडळाविषयी प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान बिथरले.

    बँकॉक :  पत्रकार परिषदेत अनेकदा राजकीय नेते आणि पत्रकारांमध्ये खडाजंगी झाल्याचे अनेकदा दिसून येते. असाच प्रकार थायलंडमध्येही घडल्याचे समोर आले आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर चिडलेल्या पंतप्रधानांनी पत्रकारांवर सॅनिटायझर फवारले.

    थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओचा प्रत्येक आठवड्यात पत्रकार परिषद घेतात. अशाच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत उत्तरे दिली. मात्र, त्याच वेळी एका पत्रकाराने मंत्रिमंडळाविषयी प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान बिथरले.

    आपल्या पोडियमजवळील सॅनिटायझर पत्रकारांवर फवारू लागले. पंतप्रधान प्रयुत चान-ओचा यांनी यावेळी पत्रकारांना तुम्ही स्वत:च्या कामाचे पाहा, मला माझे काम करू द्या, असेही म्हटले. ओचा यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओचा हे याआधी थायलंडच्या लष्करात कमांडर होते. वर्ष २०१४ मध्ये थायलंडमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार हटवून त्यांनी सत्ता काबीज केली होती.