Thailand Gold River: Gold flowing with water in the river; People carry bags

पाण्यासोबत सोने वाहणारी एक नदी आहे. थायलंडमध्ये एक अशी नदी आहे, ज्यात पाण्यासोबत सोने देखील वाहते. याचमुळे नदीच्या काठावर परिसरात राहणाऱ्या लोकांची गर्दी दिसून येते. सोन्याच्या शोधात दूरवरून लोक येतात. या नदीला सुवर्ण नदी देखील म्हटले जाते आणि ती थायलंडच्या गोल्ड माउंटेन भागात वाहते(Thailand Gold Rive). हे ठिकाण थायलंडच्या दक्षिण भागात असून त्याची सीमा मलेशियाला लागून आहे.

    दिल्ली : पाण्यासोबत सोने वाहणारी एक नदी आहे. थायलंडमध्ये एक अशी नदी आहे, ज्यात पाण्यासोबत सोने देखील वाहते. याचमुळे नदीच्या काठावर परिसरात राहणाऱ्या लोकांची गर्दी दिसून येते. सोन्याच्या शोधात दूरवरून लोक येतात. या नदीला सुवर्ण नदी देखील म्हटले जाते आणि ती थायलंडच्या गोल्ड माउंटेन भागात वाहते(Thailand Gold Rive). हे ठिकाण थायलंडच्या दक्षिण भागात असून त्याची सीमा मलेशियाला लागून आहे.

    या भागात दीर्घकाळापासून सोन्याचे खनन होत आहेत. याचमुळे नदीच्या पाण्यात सोन्याचे अनेक छोटे तुकडे दिसून येतात. नदीतील गाळात सोन्याचे अवशेष मिसळलेले आहेत. आसपास राहणारे लोक नदीतील गाळ चाळण्याचे काम करतात आणि मिळालेले सोने घेऊन घरी परततात. अशा स्थितीत ही नदी अनेक लोकांसाठी उत्पन्नाचे साधन ठरली आहे.

    अनेक लोक दररोज येथे येऊन येथील गाळातून सोने मिळवितात आणि ते विकून घर चालवितात. दैनंदिन खर्च भागेल इतके उत्पन्न यातून मिळते. 15 मिनिटांची मेहनत केल्यास सुमारे 244 रुपयांची कमाई होते असे एका महिलेने म्हटले आहे.