thailand prime minister prayuth ocha

थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा(thailand prime minister prayuth ocha fined for not wearing mask) यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्या प्रकरणी १९० डॉलर म्हणजेच जवळजवळ १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

    जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाविषयक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशाच कठोर नियमांचा फटका नुकताच थायलंडच्या पंतप्रधानांना बसला आहे. थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा(thailand prime minister prayuth ocha fined for not wearing mask) यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्या प्रकरणी १९० डॉलर म्हणजेच जवळजवळ १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

    बँकॉकच्या राज्यपालांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. नुकताच थायलंडमध्ये मास्क न घालण्यासंदर्भातील गुन्ह्यासाठी दंड वाढवून ४७ हजार रुपये इतका करण्यात आला आहे.

    ओचा यांनी आपल्या फेसबुक पेजवर एका बैठकीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्यांनी मास्क घातलेलं दिसलं नाही. याच फोटोच्या आधारे बँकॉकचे राज्यपाल असाविन क्वानमुआंग यांनी तक्रार केली. याबद्दलची माहिती क्वानमुआंग यांनीच आपल्या फेसबुक पेजवरुन दिली. पंतप्रधानांनी करोनासंदर्भातील नियम मोडल्याची तक्रार मी केलीय, असं क्वानमुआंग यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं होतं.

    थायलंडमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. थायलंडमध्ये नुकताच मास्क न घालण्यासंदर्भातील दंड वाढवून ६४० डॉलर म्हणझेच ४७ हजार रुपये इतका करण्यात आला आहे. देशातील ४८ प्रांतांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.  थेट पंतप्रधानांकडूनही झालेल्या चुकीसाठी १९० डॉलरचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड जुन्या नियमांनुसार आकारण्यात आला आहे. यापुढे पुन्हा जर कोणताही शासकीय अधिकारी मास्क शिवाय दिसल्यास सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही ६४० डॉलर दंड भरावा लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.