अमेरिकेतील भूकंपाचा परिणाम; अलास्कामध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा

मागील सात दिवसामध्ये या भागात 100 मैल अंतरात रिश्टर स्केल 3 हून अधिक तीव्रतेचा भूकंप आला नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर दक्षिण अलास्का, पेनिनसुला बेटावर सुनामीचा इशारा देण्यात आला.

    अलास्का : अमेरिकेतील अलास्का पेनिनसुलामध्ये बुधवारी रात्री भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.2 इतकी मोजण्यात आली. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप प्रशासनाकडून माहिती समोर आली नाही.

    अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास भूपृष्ठभागापासून 29 मैल खोल भूकंप आला. या भूकंपाचा परिणाम दूरवरच्या भागात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. युएसजीएसनुसार, या भूकंपाच्या धक्क्यानंतर आणखी दोन धक्के जाणवले. हे धक्के 6.2 आणि 5.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते.

    मागील सात दिवसामध्ये या भागात 100 मैल अंतरात रिश्टर स्केल 3 हून अधिक तीव्रतेचा भूकंप आला नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर दक्षिण अलास्का, पेनिनसुला बेटावर सुनामीचा इशारा देण्यात आला.