अखरे अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं ; तालिबानने आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर केला गोळीबार

तब्बल १९ वर्ष १० महिने आणि २५ दिवस अमेरिका आणि तालिबान यांच्यात संघर्ष चालू होता. आता मात्र, अफगाणिस्तानात एकही अमेरिकेचं सैन्य राहिलं नाही. त्यामुळे तालिबानने सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात अमेरिकन सैनिक मारले गेले होते.

    काबूल : अमेरिकेच्या सैन्यांनी तब्बल २० वर्षांच्या संघर्षांनंतर अफगाणीस्तानची भूमी सोडली असून अमेरिकेचे सैनिक अफगाणीस्तानातून मायदेशी परतले आहेत.१५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानच्या काही प्रांतात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर वेळेपूर्वीच अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानने आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर केला गोळीबार केला असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानशी युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अमेरिकन सैन्य पुन्हा मायदेशी परतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा काबूल विमानतळावरून अमेरिकन सैन्य निघाले तेव्हा तालिबान्यांकडून फायरिंग करण्यात आली.

     

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन सैन्यांनी तीन सी-17 विमानाने सोमवारी मध्यरात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि त्यासोबतचं अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्य अभियानाचा २० वर्षांचा शेवट झाला. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यानंतर तालिबानींनी जल्लोष साजरा केला.

    तब्बल १९ वर्ष १० महिने आणि २५ दिवस अमेरिका आणि तालिबान यांच्यात संघर्ष चालू होता. आता मात्र, अफगाणिस्तानात एकही अमेरिकेचं सैन्य राहिलं नाही. त्यामुळे तालिबानने सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात अमेरिकन सैनिक मारले गेले होते. त्यामुळे आता अमेरिका पुन्हा हल्ला करणार असल्याचा धसका तालिबानने घेतला आहे.