दोन लिंग आणि दोन अंडकोशाच्या बाळाचा जन्म; पाहून डॉक्टरही हैराण!

स्थानीय वृत्तानुसार ही घटना ऐसियट युनिव्हर्सिटीच्या शिशु रुग्णालयात घडली आहे. अहमद मेहर अली आणि त्यांची टीम पीडियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये पारंगत आहेत.

ग्रीस (मिस्र). अनुवांशिक कारणांमुळे नवजात बालकांमध्ये येणाऱ्या व्यंगाचे प्रमाण जगभरात मोठ्या प्रमाणात आहे. आनुवंशिक कारणांमुळे विचित्र बाळांचा जन्म झाल्याच्या घटनांबद्दल आपण बऱ्याचदा ऐकतो ग्रीस येथील मिस्र येथे समोर आला आहे. येथे जन्माला आलेल्या एका मुलाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. दोन लिंग आणि दोन अंडकोशासह एका बाळाने येथे जन्म घेतला आहे. वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या व्यंगाला कैडुअल डुप्लिकेट सिंड्रोम (CDS) असे म्हणतात.

स्थानीय वृत्तानुसार ही घटना ऐसियट युनिव्हर्सिटीच्या शिशु रुग्णालयात घडली आहे. अहमद मेहर अली आणि त्यांची टीम पीडियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये पारंगत आहेत. सीडीएसच्या अनभिज्ञ कारणांना समजण्यासाठी अनेक सिद्धांत उपलब्ध आहेत, परंतू या प्रकरणात हे सर्व सिद्धांत निकषांपर्यंत पोहचण्यास पुरेसे नसल्याचे तज्ञांचे मत आहे.

सीडीएस एक अत्यंत दुर्लभ घटना असते ज्यावर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांच्या चमूची गरज असते. सध्यातरी डॉक्टर या बाळाच्या जन्माचे आश्चर्य व्यक्त करीत असून या बळावरचे पुढील उपचार डॉक्टरांची कसोटी पाहणारे ठरणार आहेत.