काबूलमध्ये बॉम्बस्फोटानंतरही गोळीबाराचा वर्षाव सुरूच, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांना या घटनेची माहिती मिळताच आम्ही हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिली आहे. परंतु काबुल विमानतळावर अजून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  काबुल: अफगाणिस्तानात (Afghanistan) मागील दोन दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटचे हल्ले घडवण्यात आले होते. काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट (Gunfire In Kabul City)  करण्यात आल्यामुळे १५० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. यामध्ये काही अमेरिकन सैन्यांचाही समावेश आहे. परंतु या बॉम्बस्फोटानंतरही काबुलमध्ये गोळीबाराचा वर्षाव सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

  काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

  अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांना या घटनेची माहिती मिळताच आम्ही हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिली आहे. परंतु काबुल विमानतळावर अजून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेने नागरिकांना सांगितलं की, काबुल विमानतळापासून दूर रहा. तरीसुद्धा काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे.

  अमेरिकेने ISIS-K कडून घेतला बदला

  अमेरिकेने काबुलच्या घडलेल्या घटनेनंतर ३६ तासांच्या आतच आयएसआयएस-के (ISIS-K) कडून आपला बदला घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैन्यांनी मोठी कारवाई केली आहे. काबुलच्या ब्लास्टनंतर अमेरिकेच्या सैनिकांनी नांगरहार प्रांतमध्ये ISIS-K च्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. तसेच काबुलमध्ये ब्लास्टबाबत कट रचल्या जाणाऱ्या विचारांना आणि हल्लेखोरांचा मुडदा पाडण्यात आला आहे.

  काबुलमध्ये मृत्यूच्या आकड्यांत वाढ

  २६ ऑगस्ट रोजी काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी देखील झाले आहेत. परंतु मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.