
गुइझाउ : नवऱ्याने गिफ्ट दिलेली ब्रा लहान साइजची निघाली म्हणून पत्नीने धिंगाणा घातला. लग्नाच्या पार्टीतच राडा घालत पत्नीने नवऱ्याकडे थेट घटस्फोटाची मागणी केलीय. चीनचा दक्षिण-पश्चिम भागातील गुइझाउ प्रांतातील एका जोडप्यात झालेला हा वाद चर्चेत आलाय.
लुओ आणि यांग यांचं नुकतंच लग्न झालं होतं. यानंतर त्यांनी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. बाहेर पाहुणे मंडळी जमली असताना या जोडप्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले.
नवरदेवाने नवरीला ब्रा गिफ्ट केली होती. पार्टीनिमित्ताने ही ब्रा परिधान करण्याचे तिने ठरवले. मात्र, दोन साइज लहान निघाली.
लहान साईजची ब्रा पाहून नवरीचा पारा चढला आणि पार्टीतच तिने गोंधळ घातला. माझी साइज माहीत असताना तो छोटी ब्रा घेऊन गिफ्ट म्हणून घेऊन आला. तो आताच असं करत आहे तर पुढे माझा सांभाळ कसा करेल असं म्हणत संतापलेल्या पत्नीने थेट घटस्फोटाची मागणी केली.
चुकून लहान साइजची ब्रा आणली. मुद्दाम असं केलेलं नाही हे पतीने पटवून देण्याच प्रयत्न केला. मात्र, पत्नीने त्याचे काहीच एकले नाही. परिवारानेही मुलीचं समर्थन केलं आहे.