गेली आठ दशके शोरूममध्ये बंद आहे ही नववधू, विवाहादिवशी अचानक झाला होता मृत्यू; रात्री ही मूर्ती जागा बदलते

ही मूर्ती म्हणजे प्रत्यक्षात खरोखरच एक मुलगी असून तिच्या अंगावर मेणाचा थर देऊन तिचा तिचा मृतदेह जतन केला गेला आहे.  स्थानिक लोक सांगतात, या मुलीचा खरोखरच तिच्या विवाहादिवशी अचानक मृत्यू झाला. वधूवेशात ती सजली पण एका विषारी कोळ्याने तिला दंश केला आणि त्यात ती मरण पावली.

    आपले जग हे रहस्यांनी भरलेले आहे. त्यातील कित्येक रहस्ये अजूनही उलगडलेली नाहीत. तर काही रहस्या मागच्या कथा भयानक आहेत. या रहस्यांमागची कथा कळली तर त्यावर विश्‍वास ठेवणे अनेकांना अवघड होते. मेक्सिकोमध्ये एका दुकानात असलेली नववधूची मूर्ती हे असेच एका रहस्य आहे. गेली ८० वर्षे ही मूर्ती शोरूममध्ये आहे आणि दूरवरून अनेक पर्यटक ही मूर्ती पाहायला मुद्दाम येतात.

    याचे कारण म्हणजे असे सांगितले जाते की, ही मूर्ती म्हणजे प्रत्यक्षात खरोखरच एक मुलगी असून तिच्या अंगावर मेणाचा थर देऊन तिचा तिचा मृतदेह जतन केला गेला आहे.  स्थानिक लोक सांगतात, या मुलीचा खरोखरच तिच्या विवाहादिवशी अचानक मृत्यू झाला. वधूवेशात ती सजली पण एका विषारी कोळ्याने तिला दंश केला आणि त्यात ती मरण पावली.

    पण तिच्या आईने ती अशीच वधूवेशात कायम राहावी अशी इच्छा व्यक्‍त केल्यावर मेणाचा थर तिच्या सर्व अंगावर दिला गेला. या मूर्तीचे डोळे, केस खरे आहेत असेही सांगितले जाते. नखेसुद्धा अगदी खऱ्याप्रमाणे आहेत. असेही म्हणतात की, रात्री ही मूर्ती जागा बदलते. दर आठवड्याला तिचे कपडे बदलले जातात.

    The bride who has been locked in a showroom for the past eight decades died suddenly on her wedding day This idol changes place at night