हृदय पिळवटून टाकणारी परंपरा! शेकडो व्हेल माशांची निर्घृण कत्तल; कारण ऐकून हैराण व्हाल

या बेटाच्या परिसरात जंगल नसल्याने त्यांना अन्नासाठी समुद्रावरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ते व्हेल माशांची शिकार करतात. गेल्या दशकभरात या परंपरेमुळे 6 हजारांवर व्हेल आणि डॉल्फिन (Dolphin) माशांचा बळी गेला आहे. तसेच या परंपरेमुळे संरक्षणवादी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळत आहे.

    कोपनहेगन :  भारतातही अनेक ठिकाणी पशूबळी दिले जातात. पण आता या परंपरा थोड्या कमी झाल्या आहेत. शिक्षणानेही बराच फरक पडला आहे. परंतु, डेन्मार्कमध्ये (Denmark) अशी जागा आहे की तेथील हृदय पिळवटून टाकणारी परंपरा जोपासली जाते आणि या परंपरेमुळे तेथील समुद्राचं पाणी रक्तानी लाल होतं. येथील एका बेटावर (Feroe Island) तेथील स्थानिक लोक व्हेल (killing Whales for tradition) माशांची शिकार करतात.

    या बेटाच्या परिसरात जंगल नसल्याने त्यांना अन्नासाठी समुद्रावरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ते व्हेल माशांची शिकार करतात. गेल्या दशकभरात या परंपरेमुळे 6 हजारांवर व्हेल आणि डॉल्फिन (Dolphin) माशांचा बळी गेला आहे. तसेच या परंपरेमुळे संरक्षणवादी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळत आहे.

    डेन्मार्कमधील फेरो आयलंडमध्ये दरवर्षी पायलट व्हेल (Pilot Whales) या माशाच्या शिकारीचे आयोजन केले जाते. या परंपरेला किंवा प्रथेला ग्राईंड्रॅप (Grind Rap) किंवा द ग्राईंड (The Grind) असं देखील म्हटलं जातं. या परंपरेनुसार, व्हेल माशाला लक्ष्य केलं जातं, त्यानंतर त्याच्यावर हुक, चाकू किंवा भाल्याने वार करुन त्याला मारुन टाकलं जातं.