Taliban Laws

तालिबानने अफगाणच्या शरण गेलेल्या सैन्यांचीदेखील हत्या केली आहे.  कंधारमधील स्टेडियममध्ये उपस्थित जमावासमोर अफगाण सैन्याचे ४ कमांडर मारले. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. हे कमांडर १३ ऑगस्ट रोजी तालिबानला शरण गेले होते.

    अफगाणिस्तानात आता तालिबान्यांची सत्ता आहे. अफगाण ताब्यात घेतल्यानंतर क्रूर तालिबान्यांनी त्यांचे खरे रूप दाखवायला सुरु केले आहेत. मुळात जेव्हा देश आणि सत्ता हस्तगत केली तेव्हापासून तालिबानी क्रूरता दाखवणार नाही असा दावा करत आहे, पण हळुहळू त्याचे वास्तव आता समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत, ज्यात तालिबानी दहशतवादी अफगाणी नागरिकांना चाबकांनी मारहाण करत आहेत. तसेच, अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या लोकांना विमानतळात प्रवेश न देता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले जात आहेत. दरम्यान, बुधवारी  रात्री काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.
    तालिबानने अफगाणचे  ४ कमांडर मारले
    तालिबानने अफगाणच्या शरण गेलेल्या सैन्यांचीदेखील हत्या केली आहे.  कंधारमधील स्टेडियममध्ये उपस्थित जमावासमोर अफगाण सैन्याचे ४ कमांडर मारले. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. हे कमांडर १३ ऑगस्ट रोजी तालिबानला शरण गेले होते. याशिवाय, कंधारमधील शाह वाली कोटचे पोलीस प्रमुख पाचा खान यांचीही तालिबानने हत्या केली आहे. तालिबानी समर्थकांनी सांगितल्यानुसार, पाचा खान हा एक क्रुर कमांडर होता, जो तालिबानी सैनिकांची नखे काढायचा.