कोरोनानंतर आता माणसांनाही होतेयं बर्ड फ्ल्यूची लागण ; रशियात H5N8 स्ट्रेनचा धोका वाढला

मानवी शरीरात बर्ड फ्लू आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाच्या संशोधकांनी मानवी शरीरात एव्हियन एन्फ्लूएंजा ए व्हायरसचा H5N8 स्ट्रेन दिसून आल्याचं स्पष्ट केलं आहे. रशियाच्या दक्षिणेकडील सात जणांना ही लागण झाली आहे, असं रशियाच्या व्हेक्टर रिसर्च सेंटरच्या संशोधक अन्ना पॉपोवा यांनी सांगितलं. गेल्या वर्षी २०२० मध्ये रशियात बर्ड फ्लूचा कहर वाढला होता.

    नवी दिल्ली: कोरोनानंतर आता मनुष्यालाही बर्ड फ्ल्यूची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे. रशियात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हे सातही जण पोल्ट्रीमध्ये कार्यरत होते. या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही ट्रेस केलं जात आहे.

    मानवी शरीरात बर्ड फ्लू आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाच्या संशोधकांनी मानवी शरीरात एव्हियन एन्फ्लूएंजा ए व्हायरसचा H5N8 स्ट्रेन दिसून आल्याचं स्पष्ट केलं आहे. रशियाच्या दक्षिणेकडील सात जणांना ही लागण झाली आहे, असं रशियाच्या व्हेक्टर रिसर्च सेंटरच्या संशोधक अन्ना पॉपोवा यांनी सांगितलं. गेल्या वर्षी २०२० मध्ये रशियात बर्ड फ्लूचा कहर वाढला होता.

    बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएंजा किंवा एव्हियन म्हटलं जातं. बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांद्वारे होतो. आजारी पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस वाढतो. जिवंतच नाही तर मृत पक्ष्यांद्वारेही बर्ड फ्लूचा संसर्ग होतो असल्याच सांगितलं जात आहे.