Corona virus Vaccine

१ नोव्हेंबर २०२० पर्यंत लस देणारी केंद्र सुरु करण्यासाठी उपयायोजना करण्याच्या आग्रहाच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूला रोखणारी लस विकसित करण्यासाठी अमेरिकेत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे.

अमेरिकेत (United States) चार ते पाच कंपन्यांच्या लसी मानवी परीक्षणाच्या वेगवगेळया टप्प्यांवर आहेत. तसेच अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड (Robert Redfield) यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात(In the letter)  रोग नियंत्रण केंद्राद्वारे या लसीच्या वितरणाच्या कामात गती आणण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतील सर्व राज्यांना १ नोव्हेंबरपासून कोरोना विषाणूची लस वितरीत करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

१ नोव्हेंबर २०२० पर्यंत लस देणारी केंद्र सुरु करण्यासाठी उपयायोजना करण्याच्या आग्रहाच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूला रोखणारी लस विकसित करण्यासाठी अमेरिकेत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. मॉर्डना कंपनीची लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. अमेरिकेत ३० हजार नागरिकांवर मॉर्डनाच्या लसीची अंतिम फेजची चाचणी सुरु आहे.

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राचे संचालक रेडफिल्ड यांनी २७ ऑगस्ट रोजी सर्व राज्यपालांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. त्यांच्या अनुमतीनंतर राज्यात, स्थानिक आरोग्य विभागातर्फे रुग्णालयांसह इतर अनेक ठिकाणी ही लस वितरीत केली जाणार आहे. या लसींचे वितरम करण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीडीसीच्या वतीनं करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार १ नोव्हेंबर २०२० पर्यंत लस वितरीत करणारी केंद्रं कार्यान्वित होतील, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचा आग्रह या पत्रातून करण्यात आला आहे.