The cruel face of China came before the world; Radiation kills 1.94 lakh people and causes 10 lakh serious illnesses

चीनने जगातील पाचवी अणुशक्ती बनल्यानंतर जून 1967 मध्ये पहिली अणुचाचणी घेतल्यानंतर केवळ 32 महिन्यांनंतर पहिले परमाणू परीक्षण केले. या चाचणीमधून 3.3 मेगाटन एवढी ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 200 पट अधिक होती. मात्र परमाणू परीक्षणाचे आकडे खूप कमी आहे. त्यामुळे याच्या प्रभावाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आलेले नाही. झिंजियांग प्रांतामध्ये दोन कोटी लोकांची वस्ती आहे. तिथे किरणोत्सारामुळे लोक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.

  बीजिंग : गेल्या काही काळात कोरोनासह इतर काही घटनांमुळे चीन हा जगातील अनेक देशांच्या रडारवर आला आहे. चीनचा अजून एक महाभयानक चेहरा जगासमोर आला आहे. चीनने 1964 व 1996 दरम्यान सुमारे 45 अणुचाचण्या घेतल्या होत्या. दरम्यान, या अणुचाचण्यांमुळे निर्माण झालेल्या तीव्र किरणोत्सारामुळे तब्बल 1 लाख 94 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. द नॅशनल इंटरेस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून हा दावा करण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, सुमारे 12 लाख लोकांना या रेडिएशनमुळे ल्युकेमिया आणि कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका असल्याचाही अंदाज आहे.

  मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित

  चीनने जगातील पाचवी अणुशक्ती बनल्यानंतर जून 1967 मध्ये पहिली अणुचाचणी घेतल्यानंतर केवळ 32 महिन्यांनंतर पहिले परमाणू परीक्षण केले. या चाचणीमधून 3.3 मेगाटन एवढी ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 200 पट अधिक होती. मात्र परमाणू परीक्षणाचे आकडे खूप कमी आहे. त्यामुळे याच्या प्रभावाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आलेले नाही. झिंजियांग प्रांतामध्ये दोन कोटी लोकांची वस्ती आहे. तिथे किरणोत्सारामुळे लोक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.

  रेडिओ अँक्टिव्ह धूळ

  द नॅशनल इंटरेस्ट च्या रिपोर्टनुसार किरणोत्सर्गाच्या स्तराचा अभ्यास करणारे एक जपानी संशोधकांनी सांगितले की, शिनजियांगमधील किरणोत्सर्गाचे प्रमाण हे 1986 मधील चेर्नोबिलमधील अणुभट्टीच्या छतावर मोजण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. रेडिओ अँक्टिव्ह धूळ सगळीकडे पसरली आहे. त्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. चीनने 1964 मध्ये लोप-नूर प्रोजेक्ट मध्ये आपली पहिली अणुचाचणी घेतली होती. अमेरिकेने या अणुचाचणीला चिक-1 असे नाव दिले होते.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]