The culmination of the deformity: Mother's body was dismembered, put in a tupperware box and kept in the fridge, and ...

विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका विकृताने दोन वर्षांपूर्वी आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तुकडे केल्याचा खटला सुरू आहे. त्याने ते तुकडे खाऊन कुत्र्यालाही खायला घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास त्याला पंधरा वर्षांची कोठडी होऊ शकते.अल्बर्टो सांचेज गोमेज असे या विकृताचे नाव असून मारिया गोमेज असे मृत महिलेचे नाव आहे.

    दिल्ली : विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका विकृताने दोन वर्षांपूर्वी आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तुकडे केल्याचा खटला सुरू आहे. त्याने ते तुकडे खाऊन कुत्र्यालाही खायला घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास त्याला पंधरा वर्षांची कोठडी होऊ शकते.अल्बर्टो सांचेज गोमेज असे या विकृताचे नाव असून मारिया गोमेज असे मृत महिलेचे नाव आहे.

    फेब्रुवारी 2019 साली अल्बर्टोचे आईसोबत भांडण झाले होते. ते इतके विकोपाला गेले की या विकृताने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आपले कृत्य लपविण्यासाठी तिचा मृतदेह बेडरूमच्या बेडमध्ये 1000 तुकडे करून लपविला. त्यानंतर आठवडाभर ते तुकडे डीपफ्रिजरमध्ये एका कंटेनरमध्ये ठेऊन खात होता. त्याने त्याच्या पाळीव कुत्र्यालाही ते तुकडे खायला घातले होते.

    बाकी तुकड्यांना प्लास्टिकच्या पिशवीत भरून फेकून दिले होते. हत्येचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा त्यांच्या एका पोलिस अधिकारी मित्राने महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तपासासाठी 21 फेब्रुवारी 2019 ला जेव्हा पोलिस महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा त्या विकृताने मी माझ्या कुत्र्यासोबत आईचे तुकडे खात असल्याचे सांगितले. पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता फ्रिजमध्ये टपरवेअरच्या कंटेनरमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे मिळाले. पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.