The Dalai Lama's successor will be Dragon; US intervention

चीनमध्ये 1644 ते 1911 पर्यंत चिंग राजशाही होती. त्यानंतर चीनमधील सरकार दलाई लामा आणि अन्य अध्यात्मिक बौद्ध नेत्यांची निवड करत मान्यता देते अस श्वेतपत्रिकेत सांगण्यात आले. 14 वे दलाई लामा आता 85 वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडीची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीनंतर चीनने कुरापती सुरू केल्या आहेत.

    दिल्ली:  तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवड प्रक्रियेवरून पुन्हा एकदा चीनने कुरापती सुरू केल्या आहेत. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी चीनच निवडेल अशी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दलाई लामा यांनी स्वत: अनुयायाची निवड केल्यास त्याला मान्यता नसेल असा दावाही श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.

    चीनमध्ये 1644 ते 1911 पर्यंत चिंग राजशाही होती. त्यानंतर चीनमधील सरकार दलाई लामा आणि अन्य अध्यात्मिक बौद्ध नेत्यांची निवड करत मान्यता देते अस श्वेतपत्रिकेत सांगण्यात आले. 14 वे दलाई लामा आता 85 वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडीची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीनंतर चीनने कुरापती सुरू केल्या आहेत.

    त्यात अमेरिकेने उत्तराधिकारी निवडीत हस्तक्षेप केल्याने चीनची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळेच चीनने उत्तराधिकारी निवडीत ढवळाढवळ सुरू केली आहे. अमेरिकेने उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार दलाई लामा, तिबेटीय बौद्ध नेते आणि तिबेटमधील लोकांना असल्याचे सांगितले आहे. यासाठी अमेरिकेन काँग्रेसने तिबेटीयन पॉलिसी अँड सपोर्ट ॲक्ट ऑफ 2020 लागू केला आहे.

    मात्र, चीनने दलाई लामा निवडीची प्रक्रिया जुनी असल्याचे सांगत अमेरिकन पॉलिसीला विरोध केला आहे. तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेनुसार दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडला जाईल असे श्वेतपत्रिकेत सांगण्यात आले आहे. तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

    13 वे दलाई लामा यांनी 1912 साली तिबेटला स्वतंत्र असल्याचे घोषित केले होते. मात्र 14 व्या दलाई लामा निवडीवेळी चीनने तिबेटवर हल्ला केला. त्यात तिबेटचा पराभव झाला. तिबेटमधील जनतेने चीनचा विरोध केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. चीनने तिबेटमध्ये 1959 साली केलेल्या कारवाईनंतर 14 वे दलाई लामा भारतात शरण आले. भारताने त्यांना राजाश्रय देत हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेत राहण्याची अनुमती दिली. त्यांच्यासोबत 1959 साली मोठ्या संख्येने तिबेटियन नागरिक भारतात आले.