कुत्र्याला मिळाले नाही अन्न तर त्याने गिळले चक्क पैसे; रक्कम जाणून थक्क व्हाल!

कुत्र्याने १६० पाउंडची चावून वाट लावली अक्षरश: चोखा केला. या जगावेगळ्या कारनाम्याला पाहून तर तरुणाने डोक्यावरच हात मारायचा बाकी ठेवला होता.

नॉर्थ वेल्स. अनेकदा प्राण्यांना खाली पडलेल्या वस्तू खायची किंवा मिळेल त्या वस्तूसोबत खेळायची सवय असते. अगदी मांजराचं पिल्लू असो किंवा श्वान. हाताला लागेल त्या वस्तूला तोंडात घेऊन चावायची आणि त्याची वाट लावणे अशा स्थितीमुळे अनेकदा खूप मोठे नुकसान देखील होत असतं. एका श्वानाने असाच प्रताप केला आहे ज्याचा खूप मोठा फटका तरुणाला बसला. या श्वानाचे नाव ओजी आहे. ओजीने १६० पाउंडची चावून वाट लावली अक्षरश: चोखा केला. या जगावेगळ्या कारनाम्याला पाहून तर तरुणाने डोक्यावरच हात मारायचा बाकी ठेवला होता.

१६० पाउंड चघळल्याने मालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेवटी त्यानी डोक्यावर हात मारून घेतला. नऊ वर्षांच्या ओजीनी मालकाच्या लेटर बॉक्समध्ये असलेला चलनी नोटांनी भरलेला लिफाफा फाडला आणि त्यातील नोटांसोबत खेळायला सुरुवात केली. मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार या नोटा एकूण १६० पाउंड म्हणजेच रुपयात मोजायचे तर जवळपास १४ हजार ५०० रुपये होते. ओजीनी लेटरबॉक्समधून लिफाफा काढला आणि तो चावून त्याची वाट लावली. यूकेतील नॉर्थ वेल्समध्ये ही घटना घडली असून या घटनेनंतर ओजीचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. ओजीच्या मालकानी स्वत: फेसबूकवर आपल्या या श्वानाचा फोटो टाकून पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यानी म्हटलंय, ‘ हा दिवस मला फार महागात पडला.’