ड्रॅगनने पुन्हा ओकली गरळ; भारताशी युद्ध करण्याची चीनला खुमखुमी

पूर्व लडाखमध्ये तणाव कायम असतानाच भारताने रविवारी चीनसोबत 13 व्या फेरीत चर्चा केली. जवळपास आठ तास झालेल्या चर्चेत पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या भागातून सैन्याच्या माघारीवर भर देण्यात आला(India China War). तथापि चीनने आपल्या सरकारी माध्यमाद्वारे ‘चोर सोडून सन्याशालाच फाशी’चा प्रकार केला. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारतावरच आरोप करण्यात आले आहेत.

  बीजिंग : पूर्व लडाखमध्ये तणाव कायम असतानाच भारताने रविवारी चीनसोबत 13 व्या फेरीत चर्चा केली. जवळपास आठ तास झालेल्या चर्चेत पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या भागातून सैन्याच्या माघारीवर भर देण्यात आला(India China War). तथापि चीनने आपल्या सरकारी माध्यमाद्वारे ‘चोर सोडून सन्याशालाच फाशी’चा प्रकार केला. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारतावरच आरोप करण्यात आले आहेत.

  भारताने चुकीच्या आणि अवास्तव मागण्या मांडल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच चर्चेत अडथळा आणण्याचे काम भारताने केल्याचे सांगत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित असल्याचा दावाही चीनने केला आहे. लड्डाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांनी शस्त्राविना चिनी सैनिकांना कसे पिटाळून लावले होते, याचा वीसर चीनला पडला असल्याचे दिसत आहे.

  मनासारखे होणार नाही

  भारताला जशी सीमा हवी आहे, तशी कदापी मिळणार नाही आणि याच सीमावादामुळे जर युद्ध झाले तर भारताचा दारूण पराभव होईल, असे चीनच्या सरकारी वृत्तपत्रातील लेखात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका आणि चीनमधील ताणलेल्या संबंधांचा फायदा भारत घेऊ इच्छितो. मात्र, चीन अजूनही भारताकडे एक महासत्ता म्हणून पाहते आणि भारतात सीमा वाद लांबवण्याची बरीच क्षमता आहे, याची जाणीवही चीनला आहे. परंतु, चीनला सीमावाद लांबवण्याची गरज भासली तर हा वाद लांबतच जाई, असा पोकळ इशाराही चिनी वृत्तपत्राने दिला आहे.

  चीनची अडेलतट्टू भूमिका

  चिनी माध्यमांनी पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भारत अवास्तव मागण्या केल्यानेच चर्चेत अडथळा आल्याचा आरोप केला आहे. यासोबतच भारतीय स्थितीचे चुकीचे आकलन करणार नाहीत आणि सीमेवरील कठीण प्रसंगही हाताळतील तसेच वेळोवेळी झालेल्या करारांचेही पालन करतील असे सांगितले. चिनी सैन्याधिकारांचा हा प्रकार चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचाच असून पूर्व लडाखमध्ये चीनच्या कारवाया अख्ख्या जगाला माहिती आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांततेसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच तोडगा निघालेला नाही. चीनने यावेळीसुद्धा अडेलतट्टू भूमिका घेतल्याचेच दिसून आले.

  चर्चेची 13 वी फेरी निष्फळ

  दरम्यान, भारतीय लष्कराने चर्चेच्या 13 व्या फेरीत काय झाले याची माहिती दिली आहे. प्रत्यक्ष निंयत्रण रेषेवर तणावाची स्थिती अद्याप कायम आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेतून काहीच तोडगा निघालेला नाही. चुशुल मोल्दो सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी आठ तास चर्चा केली. यावेळी दोन्ही देशातंमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह इतर मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. मात्र यातही काहीच समाधानकारक अशी चर्चा होऊ शकली नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद्भवलेली परिस्थिती ही चीनने द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत केलेल्या एकतर्फी प्रयत्नांमुळे निर्माण झाली असल्याचे भारताने यावेळी सांगितले. त्यामुळे संबंधित भागात चीनने योग्य ती पावले उचलावीत आणि पश्चिम भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण व्हावी असेही भारताने म्हटले. चर्चेदरम्यान भारतीय पक्षाने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक सल्ले दिले, मात्र चीनने त्यावर असहमती दर्शवित कोणताही प्रस्ताव दिला नाही. यामुळे भारत आणि चीनमधील चर्चेची 12 वी फेरीदेखील निष्फळ ठरली.

  म्हणे, हा तर संधीसाधूपणा

  भारताच्या या भूमिकेला चीनने संधीसाधूपणा संबोधले आहे. दिल्लीला असे वाटते की, चीनला त्यांच्या मदतीची गरज आहे. कारण, चीनला आपल्या पश्चिम सीमेवर स्थैर्य हवे आहे. भारत, चीन-अमेरिकेतील वाईट संबंधांचा गाजावाज करीत कुटनितीक मोर्चावर सौदेबाजी करून तिरपी चाल चालत आहे. अमेरिकेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी भारत चीनवर दबाव टाकत आहे. मात्र, हा संधीसाधू व्यवहार भारताचा आंतरराष्ट्रीय कुटनितीतील दर्जा कमी करणारा आहे. सीमा वादावर सामंजस्याने आणि आपसी संबंधातून तोडगा काढणे आवश्यक आहे. मात्र, भारत ज्याप्रमाणे चीनवर दबाव टाकत आहे, ते पाहता भारताच्याच हिताला नुकसान पोहचेल, असा इशाराही चीनच्या ग्लोबल टाईम्सने दिला आहे.