हत्तीने केला हत्तीणीला असा KISS  ; हत्तीचा Viral Video एकदा बघाच

ट्विटरवर १९ सेकंदाचा हत्तीचा एक क्युट व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हत्ती एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात.यानंतर आपली सोंड हवेत फिरवत एकमेकांना किस करतात.

    नवी दिल्ली : सध्या ट्विटरवर एक Video  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे . ज्यात दोन हत्ती  एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

    ट्विटरवर १९ सेकंदाचा हत्तीचा एक क्युट व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हत्ती एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात.यानंतर आपली सोंड हवेत फिरवत एकमेकांना किस करतात.हा व्हिडिओ केनिया  येथील शेल्ड्रिक वाईल्ड लाईफ ट्रस्ट संघटनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही संघटना हत्तींना वाचवण्याचं, त्यांना नवं आयुष्य देण्याचं आणि अनाथ हत्तीच्या पिल्लांची काळजी घेण्याचं काम करते. या व्हिडिओला एलिफंट्स किसिंग असं कॅप्शन देण्यात आलं आहे.