बापरे…फोटो काढणाऱ्या बापलेकीला पाहून पिसाळला हत्ती आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा..,धक्कादायक VIDEO VIRAL

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तींना ज्या भागात ठेवण्यात आलं आहे, त्या भागात जातो. एकटाच नाही तर सोबत आपल्या छोट्या मुलीलाही नेतो. तिला घेऊन फोटो काढत असतो. इतक्यात त्यांच्या मागून एक हत्ती धावत येतो. आपल्या परिसरात कुणीतरी दुसरंच घुसल्याने हत्ती अगदी संतप्त झालेला दिसतो. त्याचवेळी व्यक्ती मुलीला घेऊन पळ काढतो.

    प्राणी संग्रहालय किंवा एखाद्या नॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतर अनेक जणांना फोटो काढण्याचा प्रचंड मोह असतो. काही लोक तर अशा प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तींना ज्या भागात ठेवण्यात आलं आहे, त्या भागात जातो. एकटाच नाही तर सोबत आपल्या छोट्या मुलीलाही नेतो. तिला घेऊन फोटो काढत असतो. इतक्यात त्यांच्या मागून एक हत्ती धावत येतो. आपल्या परिसरात कुणीतरी दुसरंच घुसल्याने हत्ती अगदी संतप्त झालेला दिसतो. त्याचवेळी व्यक्ती मुलीला घेऊन पळ काढतो. पळता पळता त्याच्या हातातून मुलगी सटकते आणि जमिनीवर पडते. सुदैवाने हत्ती ठरलेल्या जागेच्या पुढे जात नाही. व्यक्ती जमिनीवर पडलेल्या आपल्या मुलीला पुन्हा उचलतो आणि तिथून पळ काढतो.

    दरम्यान, हत्तीसोबत फोटो काढायला गेलेल्या बापलेकीच्या मागे पिसाळलेला हत्ती धावून आला. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून काळजाचा ठोका चुकवणारी घटना येथे घडली आहे.