The excitement of reaching Corona where the man is but difficult to reach; Corona infection to climber at Everest base camp

जगातील सर्वांत उंच शिखर एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर कोरोनाची एन्ट्री झाली असल्याचे वृत्त आहे. गतवर्षी नेपाळ सरकारने कोरोना साथीमुळे एव्हरेस्ट व अन्य शिखर मोहिमांना परवानगी दिली नव्हती. मात्र यावेळी गिर्यारोहण मोहिमांना परवानगी दिली असून त्यानुसार अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दाखल झाले आहेत. नॉर्वेच्या एलेंद नेस्ट याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यावर त्याला हेलिकॉप्टरने काठमांडू येथे रुग्णालयात हलविले गेले होते.

    दिल्ली : जगातील सर्वांत उंच शिखर एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर कोरोनाची एन्ट्री झाली असल्याचे वृत्त आहे. गतवर्षी नेपाळ सरकारने कोरोना साथीमुळे एव्हरेस्ट व अन्य शिखर मोहिमांना परवानगी दिली नव्हती. मात्र यावेळी गिर्यारोहण मोहिमांना परवानगी दिली असून त्यानुसार अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दाखल झाले आहेत. नॉर्वेच्या एलेंद नेस्ट याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यावर त्याला हेलिकॉप्टरने काठमांडू येथे रुग्णालयात हलविले गेले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार नेस्ट यांचा कोरोना रिपोर्ट १५ एप्रिल रोजी पोझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना त्वरीत काठमांडू येथे हलविले गेले. आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते सध्या नेपालीमध्ये परिवारासोबत राहत आहेत.

    ऑस्ट्रियन अनुभवी गाईड लुकास फर्नबॅश यांच्या मते हे मोठे संकट आहे. हजारो गिर्यारोहक, वाटाडे मोठ्या संख्यने बेस कॅम्पवर आहेत. येथे कोरोनाचा शिरकाव झाला असेल तर हे संक्रमण वेगाने पसरण्याची भीती आहे. त्यामुळे उपस्थितांच्या तातडीने चाचण्या कराव्यात. मे हा महिना एव्हरेस्ट चढाईसाठी विशेष चांगला सिझन मानला जातो. त्यासाठी मोठ्या संखेने गिर्यारोहक येतील त्यापूर्वीच हा सिझन संपविला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.