हॉस्पिटलची हद्दच झाली ;  ऑपरेशन आधी महिला रडली अन मग काय? हॉस्पिटलने रडण्याचेही घेतले पैसे.. वाचा संपूर्ण  प्रकरण

मिज नावाची महिला चेहऱयावरील तीळ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी गेली होती. ऑपरेशन होण्यापूर्वी ती महिला भावुक झाली आणि तिला रडू कोसळलं. हॉस्पिटलने मात्र जेव्हा महिलेच्या हातात शस्त्रक्रियेचे बिल दिले तेव्हा त्या बिलात चक्क रडण्याचे पैसे आकारले. अमेरिकेतील ही घटना आहे.

    अनेकदा आपण सर्वांनी हॉस्पिटल रुग्णांकडून कसे पैसे उकळतात याचे अनेक किस्से ऐकले, वाचले आहेत. मात्र एका हॉस्पिटलने पैसे उकळण्याची हद्द केली आहे. एक महिला शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा तिच्या हातात बिल पडले तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.

    काय आहे प्रकरण
    मिज नावाची महिला चेहऱयावरील तीळ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी गेली होती. ऑपरेशन होण्यापूर्वी ती महिला भावुक झाली आणि तिला रडू कोसळलं. हॉस्पिटलने मात्र जेव्हा महिलेच्या हातात शस्त्रक्रियेचे बिल दिले तेव्हा त्या बिलात चक्क रडण्याचे पैसे आकारले. अमेरिकेतील ही घटना आहे. या प्रकाराने महिलेला मोठा धक्का बसला. तिने हॉस्पिटलच्या बिलाचा पह्टो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ब्रीफ इमोशन’ असे नाव देऊन ११ डॉलर म्हणजे ८१५ रुपये आकारण्यात आले. या प्रकाराने हैराण झालेल्या महिलेने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले बिल पाहून नेटिझन्सनी या ट्विटवर कमेंट्स करत हॉस्पिटल प्रशासनावर टीका करायला सुरुवात केली.