टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच झळकणार स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात भारताचा तिरंगा फडकणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात भारताचा तिरंगा फडकणार आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेसन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए) ने बोलताना सांगितले की, टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदात तिरंगा फडकवून १५ ऑगस्ट २०२०  रोजी इतिहास रचण्यात येणार आहे. 

या आधी न्यूयॉर्क मधील टाइम स्क्वेअर वर काही दिवसांपूर्वीच राम मंदिर भूमीपूजनाचे चित्रीकरण दाखवण्यात आले होते त्यानंतर आता १५ ऑगस्टला होणाऱ्या  स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय तिरंगा टाइम स्क्वेअरवर झळकणार असल्याने भारतीयांसाठी हे गर्वाची बाब मानली जात आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जायसवाल ध्वजारोहण कार्यक्रमासाठी  उपस्थित असणार आहेत.

अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये विशाल बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचे थ्री डी फोटो झळकले होते. विशाल नॅस्डेक स्क्रीन व्यतिरिक्त १७,००० चौरस फूट एलईडी स्क्रिनवर थ्रीडी फोटों प्रदर्शित केले गेले होते. दरम्यान, टाइम्स स्क्वेअरवर लावण्यात आलेला बिलबोर्ड जगातील सर्वात मोठा आणि आकर्षक बिलबोर्डपैकी एक आहे. तसेच पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.